Showing posts with label #lifeskills. Show all posts
Showing posts with label #lifeskills. Show all posts

Being Relevant

beingrelevant  मुसाफिर तो सभी बनते हैं ,कभी कभी खुद ही यात्रा बनने की कोशिश करनी चाहिये !


Getting old , going silver is not an issue .
वय वाढणं , केस पांढरे असणं आणि ते काळे करणं किंवा चाळीशीच्या पन्नाशीच्या साठीच्या पुढे असणं यात अनुभवांची समृद्धी असते .

प्रत्येकाच्या आजुबाजूला या वयोगटातील कुटुंबातले सदस्य असायला हवेत. मित्र मंडळी असायला हवीत.
वयोगट आणि विविध सामाजिक स्तरावरील व्यक्तिंशी बोलचाल असली तर आपली स्वतःची अशी personality आकाराला येते.

Cross culture Metacognition साठीची प्रयोगशाळा आहे ही.

Getting old is not an issue but Being Relevant is Important.

हे Being Relevant असणं आपल्याला माणूस म्हणून साॅफ्ट स्किल्स शिकवतं.

जे माझ्या आयुष्यात घडत नाही ते चुक नसतं पण तसंही घडतं.  हे घडताना विशिष्ट वयोगटातील व्यक्ती कशा react करतात?

आपण विद्यार्थी असलो की आपलं आकलनात वाढतं. 
अच्छा,  हे असंय होय! असंही असू शकतं तर? मी या बाजूने कधी विचारच केला नाही. 

Being Relevant साठी फार गुंतवणूक नको.  फक्त कान, डोळे, मन , बुद्धी आणि हृदय यांची दार सदैव उघडी हवीत. 

#Empathy हवी इतरांना समजून घेण्यासाठी.

कडवटपणा न ठेवता आपलं मत कायम ठेवून ऐकता आलं  पाहिजे.
लोकेशन महत्वाचं असतं.
जसं माझं तसं इतरांचं.  कुठेतरी एखादा ब्रिज सापडतोच. 
तो सुटू द्यायचा नाही  . तोल जातोय असं वाटलं की तो पकडायचा नात्यातल्या  समतोलासाठी.

कठिण नाही आहे. स्टिरिओटाईप मतं बदलता आली पाहिजेत.  मनात ही लवचिकता रातोरात येणार नाही.

त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील जातीतील,  धर्मातील व्यक्तींना भेटायला हवं.

कचाकचा चर्चा करायची गरज नाही प्रत्येक भेटीत.
आता काय वाचतोय?
काही वाचलंत तरी आहेस सद्या?
काय पाहतोस? हे पहाच.

ठीकाय म्हणायचं.
समजा समोरच्याला अभिप्रेत असलेलं आपण वाचलेलं नसलं तर तो पेट्रोलच्या उपड्या केलेल्या ड्रमावर उभा राहणार आणि दवंडी पेटवणारच .

त्याचं वागणं टाळता येणार नाही आपल्याला.

हे  बाय प्राॅडक्ट तर टाळता न येण्यासारखं आहे.

तरीही उत्तर द्यायचं नाहीच.

ठिणग्या, अस्मितेच्या लढाया गंगेत बुडवायच्यात.

फक्त ऐकायचं.

मत द्यायची गरज नाही.
शांत बसणं हे  सुद्धा एक निवेदन आणि भुमिका असते. 
डोमेन वेगळं असतं तेव्हा
Relevant असणं म्हणजे श्रोत्याच्या भुमिकेत शिरणं.

आपल्याला जे काही येतं ते सगळं आपण सोशलमिडियावर सांगत नसतो किंवा इतरांना पटवून देत नाही. 
ती एक प्रोसेस असते.
कोण कुठल्या पानावर आहे हे देखील महत्वाचे.

सगळे काड्यापेटीतल्या काड्यांसारखे समान नसतातच मुळी.
म्हणून तर समाज बनलाय.

वय वाढणं, केस रूपेरी होणं यात समृद्धी आहे आणि ज्यांच्याकडे हा ठेवा नाही त्यांच्यासाठी त्यांच्या भुमिकेत शिरून विचार करणं हे being Relevant आहे. 

#crossculture #sulawrites #marathi #leadershipdevelopment #lifeprocess
( photo credit 💃Me. रिओ दि जनेरो शहरातील आमच्या घराच्या  बाल्कनीतून दिसणारा सूर्योदय

Power of Pause

Power of Pause 🧘‍♀️

काल एल्विस प्रिस्लेच्या आयुष्यावर आधारित सिनेमा पाहिला. 
जड मनानं थिएटर बाहेर आले. 
एका कलाकाराची शोकांतिका काळाला पुरून उरलीय. 

आयुष्यात पाॅज घेणं किती महत्वाचं आहे यावर लिहावंसं वाटतंय. 

एक दिड मिनिट थांबणं. उत्तर देण्यापुर्वी pause घेणं हा बावळटपणा नाही. 
धाडकन कुणाचा अपमान करत खिल्ली उडवणं सोप्पंय. 
नहले पे दहला. 
ये लगा सिक्सर. 
सांस्कृतिक बुद्धिमत्ता शिकताना काही मिनिटांचा पाॅज याबद्दल नेहमी सांगतात. 
Unwanted Outcome टाळण्यासाठी या पाॅजचा उपयोग होतो. 
तुम्ही कोणत्या संस्कृतीत वाढलात त्यावर या पाॅज घेणा-याला लेबल्स लागतील. 
कुणी बावळट म्हणेल, कुणी कुंपणावर बसणारा कुणी म्हणेल अंदाज घेतोय तर कुणी म्हणेल मोठ्याची बाजू. 
कुणाला वाटेल मंद आहे, अज्ञानी आहे, आत्मविश्वास कमी आहे. 
भावनिक बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक बुद्धिमत्ता यामध्ये हा पाॅज जागरूकता घेऊन येतो. 
उत्तम भावनिक बुद्धिमत्ता असेल तर आपल्याला नेमकं समजतं कशाने आपण ट्रिगर होतो. केव्हा आपल्याला पाॅज घ्यायचाय. 
उत्तम सांस्कृतिक बुद्धिमत्ता असेल तर आपण या पाॅजला context मध्ये बदलू शकतो. 
जिथे EQ संपतो तिथे CQ सुरू होतो. 

नव्वद सेकंदाच्या वेळेत आपण इगो बाजूला ठेवू शकतो, आपल्याला जे वाटतंय त्या भावनेला नाव देऊ शकतो. जे घडलंय आणि घडू शकतंय याचा विचार करू शकतो. तडकाफडकी नको ते शब्द बोलून मन दुखावण्यापेक्षा थोडं थांबून चित्त था-यावर आणू शकतो. 

थोडं स्लॅन्ग बोलायचं झालं तर छोट्या बापाचं झाल्यानं काही बिघडत नाही. 
Impulsive react केल्याने होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. 
फक्त थोडंसं गप्प तर रहायचंय. 
थांबून उत्तर द्यायचंय. 
पाॅवर ऑफ पाॅज म्हणतात याला. 

खुपदा ओठावर येतं की याला उपरोधाने काही बोलावं, सुनवावं, झाडून काढावं,शाळा घ्यावी. 
हा क्षणिक मोह टाळायला हवा. 
आपले इमोशनल ट्रिगर्स आपल्याला समजायला हवेत. इतका प्रामाणिकपणा स्वतःला दाखवायला हवा. 
दिड मिनिटं म्हणजे नव्वद सेकंद थांबायचं. 
विचार करायला वेळ घ्यायचा. रिॲक्ट न करता रिस्पाॅन्ड करायचं. 
कुणाला लगेच उत्तर न दिल्याने कमीपणा येत नसतो. 

काही पोस्ट वर मिठात खडा पडतो तसं कुणीतरी माथेफिरू हा हा करून जातं तेव्हा असाच विचार असतो. आपले शत्रू आपण निवडायचेत आणि ती लायकी तो दर्जा कुणालाही द्यायचा नाही. 
कुणी ट्रिगर दाबण्यासाठी जर हा हा करत असेल तर 
लगेच त्यावर रिॲक्ट केल्याने काय होईल?
आपण भरत असलेला आयकर कमी होईल? आपल्या घराचे चौरस फूट कमी होतील? हात पसरून जगणं हाती येईल की शिक्षण किंवा समाजातील मान कमी होईल? आपलया कुटुंबाचा आपल्यावरील विश्वास कमी होईल?
आपल्या आजारपणात सोशल मिडिया वर हात पसरावे लागतील की आणखी दयनीय काही पहावं लागेल? 

उत्तर देऊन सोक्षमोक्ष लावणं म्हणजे त्या हा हा करणा-या रिकामटेकड्या व्यक्तिच्या जाळ्यात अडकणं. तिच्या पायरीवर येऊन वागणं. 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य. मनाची शांतता. ती राखायची. फिटनेस सांभाळायचा. स्वार्थी व्हायचं स्वतःसाठी. 
एकच आयुष्य असतं. मेल्यावर एका तांब्यात जातो आपण .कुणी थांबत पण नाही जळेपर्यंत. 
जर इथलं उदाहरण घेतलं तर अमुकची पोस्ट चांगली, अमुकचे इतके फाॅलोअर्स, इतके लाईक्स हे सर्व मोहमाया. 
एक पाॅज हवाच. 
मनाला ब्रेक, लगाम किंवा बांध म्हणूयात. 
लोकं बांध कोरतात आपण ठाम रहायचं. 
आपण लिहिलेल्या, बोललेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी आपली असते. 
शांततेचं महत्व ओळखून वागायचं. 
 #crossculture #sulawrites #marathi #powerofpause 

Popular choice

Working Woman and Biases

#workingwomen #biases  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...