ब्राझील मध्ये ऑलिम्पिक मशाल तब्बल तीनशे किलोमीटर फिरली असेल . रिओ मध्ये ते शेड्युल माहित होतं .
स्वयंपाक आटोपून तिथे जाण्याची तयारी करतंच होते .खुप दिवसांनी वरणाच्या फोडणीत कढीपत्ता टाकता आला. एक भारतीय स्वयंसेवक माझ्या साठी पाव किलो कढीपत्ता घेऊन आले होते भेट म्हणून .
रिओत कढीपत्ता मिळत नाही. संव पावलो शहरात सहज मिळू शकतो. आठ महिन्यानंतर मला कढीपत्ता मिळाला म्हणून त्या खुशीत होते .फोडणी टाकताना रस्त्यावर आवाज यायला लागला . मोर्चा निघाल्यासारखा .
खिडकीतून पहिलं तर ऑलिम्पिकचा टॉर्च निघाला होता. तसाच गॅस बंद केला.घरच्या कपड्यावर म्हणजे टी शर्ट,गळ्यात मंगळसूत्र , हातात भारताचा झेंडा आणि डोक्यावर ब्राझील ची टोपी ह्या अवतारात,' फिर भी दिल है हिंदुस्थानी ' म्हणंत दोन किमी धावत गेले.
ब्राझीलचे प्रेसिडेंट ज्या काॅलनीत राहतात त्याच्याच उजव्या बाजूच्या इमारतीत घर होतं आणि डाव्या बाजूला एक फाईव्ह स्टार हाॅटेल.
एकोणतिसाव्या मजल्यावर राहत असल्याने घरातून खाली घडणा-या घडामोडी दिसत होत्या. ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक दोन्ही साठी स्वयंसेवक असल्याने खेळाशी संबंधित बरेच अपडेट घेत होते.
तर खाली रस्त्यावर आवाज सुरू झाला. उत्सवाचं स्वरूप होतं.
कोणी काहीही म्हणोत गर्दीचा सागर चिरून धावत गेले.
विचार केला आज नाही तर मग केव्हा आणि धावणं तसंच ठेवलं.
एव्हाना ऑलिम्पिकची मशाल एका फाईव्ह स्टार हॉटेल पाशी येऊन थांबली. धापा टाकत झेंडा , टोपी चष्मा सांभाळत कशीबशी पोहोचले. जमेल तेवढ्या पोर्तुगीज मध्ये विनंती केली . त्यांनी विचारले कोणत्या देशाचे आहात.
मी म्हटलं,' भारत' पण 'ब्राझील' सुद्धा .
सद्या कर्मभूमी आहे आमची .
त्यांनी छान स्माईल दिले आणि मला स्पेशल फोटो मिळाला.
( 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवक म्हणून महिनाभर काम केलं तेव्हाची ही एक आठवण)
#crossculture #sulawrites #marathi #harghartirangacampaign
No comments:
Post a Comment