Domestic Engineer Prabha

labourday #domesticworkers 

आजच्या कामगार दिनानिमित्त प्रभा भोसलेची ओळख. 
ओशिवरात आनंदनगर म्हणून एक निम्न मध्यमवर्गीय बैठ्या घरांची काॅलनी आहे. 

 जुन्नर, मंचर, आंबेगाव परिसरातील डबेवाले, फुलवाले, भाजी विकणारा पुरूष वर्ग आणि घरकाम करणा-या स्त्रिया. आमच्या विभागात घरटी साताठ हजारांहून जास्त काम निघतंच.  
सधन, संपन्न आणि बहुतांशी अमराठी काॅलनी आहे ही. किमान हजार चौरसफुटांची घरे. घरटी तीन एक चारचाकी. तीन तीन डोमेस्टिक इंजिनिअर असतात काही काही घरात. या स्त्रिया शेअर रिक्षाने लोखंडवालात जातात कामाला. महिन्याला पाचेक हजाराची भिशी लावतात. गावी माडीची घर बांधतात. यांचे नवरे भल्या पहाटे गाड्या धुण्याचीही कामं करतात. स्मार्ट फोन वापरतात या डोमेस्टिक इंजिनिअर्स. राहणीमान उत्तम आणि स्वच्छता वाखाणण्याजोगी.  

यांची घर एकावर एक माडीची. अगदी दोनशे चौरस फुटांची देखील. मी मुंबईत आले की माझ्या डोमेस्टिक इंजिनिअरच्या घरी मासवडी खायला नेहमी जाते.  

इतके दिवस झालेत देश सोडून मी यातल्या सगळ्या माझ्या whatsapp मधे आहेत. इंदुरकरांचे forwards करतात मला. मराठा समाजातील, बहुजन समाजातील ,कुणबी समाजातील स्त्रिया व्यावसायिक रित्या हे काम सांभाळत आहेत. यांच्यावर एक अनुबोधपट व्हायला हवा.

  मुंबईल्या फिल्मी उपनगरात काम करणा-या घरंदाज स्त्रिया. ओशिवरा पोलिस स्टेशनमधे चौकशी केली तर रहिवाशांच्या तक्रारी भांडणं असतील पण या कष्टकरी स्त्रियांच्या तक्रारी कमी दिसतील. माझे या वर्गाशी घरचे संबंध आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी गेलेय त्यांनी मला बांगड्या भरायला पैसे ठेवा ताई म्हणत शंभर दोनशे रूपये हातात बळेबळे कोंबलेत.

फोटोतलं घर प्रभाचं आहे. ती माझी डोमेस्टिक इंजिनिअर होती ओशिव-यात.  
 माझे खूप लाड करते. दुधाचा चहा हा त्यातलाच प्रकार. तीच्या घरात इटालियन मार्बल आहे.

फोटोत तिचं घर दिसतंय ते आनंद नगर मधलं. 

प्रभाकडे स्मार्ट फोन आहे. तीला लिहिता वाचता येत नाही. ती मला voice messege / videos send करते.

#crossculture #मराठी #gratitude #marathi #sulawrites

No comments:

Post a Comment

Popular choice

Working Woman and Biases

#workingwomen #biases  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...