#गुरूपौर्णिमा
शाळेत असताना कितीतरी सुंदर गुलाब वाया गेलेत. नको त्या टिचरना दिले गेले.
ते गुलाब वगळता चुकीचे अनुग्रह घेतले नाही की गंडे दोरे बांधले नाही.
आई वडिल आणि कुटुंबासारखा गुरू नाही.
Do not forget You are a Beautiful woman असं नेहमी म्हणणारे वडिल म्हणजे Motivational गुरू.
सहन केल्याने कष्ट केल्याने माणूस मरत नाही असं म्हणणारी आई ही आणखी एक गुरू.
आयुष्य तर महागुरू.
पत्रकारितेतील मिडियातील गुरू म्हणजे सदा डुंबरे, देवकिसन सारडा, राजू काणे.
इलेक्ट्रॉनिक विश्वात युटिव्हीचे निरव सर .
ज्यांच्या अनुबोधपटला राष्ट्रीय पुरस्कार
मिळाला ते दिग्दर्शक राकेश शर्मा म्हणजे organisational Behavior मधले गुरू.
सर ,मुझे इंग्लिश नही आता है. सब लोग मजाक उडाते है.
मै भी हिंदी मिडियमसे पढा हू असं म्हणत माझं नाव रिसर्च टिमच्या लिस्टमध्ये सगळ्यांत वर टाकणारे राकेश शर्मा.
शाळेत मालपाणी मॅडम.
स्वयंपाकघरातील गुरू आई, सासूबाई, नवरा
मम्मा, यु आर दि बेस्ट म्हणणारा लेक म्हणजे आत्मविश्वास वाढवणारा गुरू.
निस्वार्थ प्रेम करा असं शिकवणारा आकिचान आणि लॅब्रेडाॅर आस्था दोघेही दत्ताची मुलं.
दत्तगुरू.
संकटामागून संकटं आणि आघात देणारी नियती आणि नशीब Crisis Management गुरू
सविनय कायदेभंग करून सत्याग्रह करून जग जिंकता येतं म्हणणारा साबरमतीचा संत हाही सदासर्वकाळ गुरू.
असंख्य अगणित गुरू आकाशगंगेतल्या ता-यांप्रमाणे.
सगळ्यांसाठी gratitude .
#गुरूपौर्णिमा #gratitude #sulawrites #crossculture
No comments:
Post a Comment