workpartner #dogsatwork #dogsoflinkedin लुईज हा एका फेरिवाल्या आज्जीचा सहकारी आहे. फोटोत दिसतोय तो.
रिओ मधला रविवार चा बाजार.
कर्मयोगी असण्यासाठी जग इकडंच तिकडे करायची गरज नाही.
ही एक चिया ( मावशी / काकू ) सत्तरीत असेल. दिसतेय खूप तरूण.
मी पाहिलेल्या सदासुखी माणसांपैकी एक आहे ती.
Second Hand वस्तू विकते .पावसापाण्यात ऊन्हातान्हात रिकाम्या रानी तिची मोडकळीस आलेली गाडी, तिचा कुत्रा आणि भंगार गोळा केलेल्या वस्तू घेऊन ही वेगवेगळ्या बाजारांमध्ये तिची गाडी लावते.
दुर्दैवाने तिला सर्वात मागची जागा मिळते. जिथे फक्त पार्किंग झोन आहे.
गेले आठ वर्षं मी तिला दर रविवारी पाहतेय.
तिच्याकडे एक डब्बा गाडी आहे जी पोर्टेबल दुकान बनून जाते. गाडीचं बोनेट बनतं स्टेज. लुईज तीचा पाळीव कुत्रा आहे. आमच्या आकिचानचा
रविवारच्या बाजारातला मित्र सुद्धा.
रविवारी सगळे जण त्यांच्या पाळीव कुत्र्यांना बाजारात आणतात.
लुईज च्या गळयात पट्टा नसतो. तो मार्केट भर फिरत असतो.
मला गरज नसतानाही मी एखादी तरी वस्तू चिया कडून विकत घेतेच.
ती माझ्यासाठी Antic वस्तू घेऊन येते नेहमी.
पुन्हा केव्हातरी तिची विस्तृत मुलाखत करीन.
#streetmarkets #crossculture #sulawrites #marathi
No comments:
Post a Comment