storytime Neither Glory nor struggle is forever in life .
आयुष्यात यश अपयश उनपाऊस असणारंच.
आपण आपल्या व्हॅल्यूज शी प्रामाणिक रहायचं.
This is my fav photo.
बरेच दिवस झालेत .
मी रिओत राहते. रिओ दि जनेरो या शहरात .आता आठ वर्ष होतील. एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत मुलाखत होती. दुस-या शहरात. विमानाने जाणं महाग तर होतंच पण वेळखाऊ होतं .मला सकाळी जाऊन रात्री परत यायचं होतं.
ते शहर 430 km दूर होतं.
ही मुलाखत एच आर डायरेक्टर आणि प्रेसिडेंट घेणार होते.
रिओ आणि संव पावलो मार्गावर प्रचंड विमान वाहतूक असते पण विमानतळ ते ऑफिस अंतर पार करायला टाईम मॅनेजमेंट होत नव्हती.
मग बसने जाण्याचा विचार केला .
तब्बल आठ तासांचा प्रवास .दुपारी दोनची मुलाखत होती.
पहाटे तीनला माझ्या डाॅगला वाॅक करवून आणला.मग लेकाचा ब्रेकफास्ट करून डायनिंग टेबलवर ठेवला. साडे चारची बस पकडण्याची पंचवीस किमी दूर मुख्य आगारात गेले टॅक्सी पकडून.
बफरिंग टाईम होताच .
संव पावलोत इतकं ट्राफिक असतं. तिथेच बस अडकली.
मी जीन्स टीशर्ट मध्ये होते.
संव पावलो बस डेपोत फ्रेश होण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी सोय आहे. कपडे इस्त्री करता येतात. वीस रूपये देऊन तुम्हाला शाॅवर घेता येतो. यात साबण, स्वच्छ टाॅवेल मिळतात. तिथे हेअर ड्रायर असतो, इस्त्री असते.
मीही वीस रूपये देऊन अर्ध्या तासांत तयार झाले आणि मुलाखतीला गेले.
एच आर मधील जागेसाठी.
भारतातली फार मोठी आय टी कंपनी आणि तिचे ब्राझील प्रेसिडेंट हे पुणेकर होते . आमच्या चक्क मराठीत गप्पा झाल्यात.
मराठी, इंग्रजी आणि पोर्तुगीज मध्ये हा Interview होता .
ऑफिसचा पत्ता शोधत असताना रिसेप्शनला पोहोचले तेव्हा मागून कुणीतरी साहेब आलेत आणि म्हणालेत, वेळेवर पोहोचलीस सुलक्षणा 👏👏
त्यांनीच माझी माहिती दिली डेस्कवर आणि 'लेट्स गो ' म्हणत आम्ही लिफ्टकडे आलो.
लिफ्ट मध्ये गेल्यावर मला जाणवलं की मी पायातले जोडवे काढले नव्हते. स्कर्ट घातला होता. उगीच काॅन्शस होऊन गेले आणि चुकून वेगळ्याच मजल्याचं बटण दाबून बाहेर पडले.
तर ते प्रेसिडेंट म्हणालेत, अगं, तु आपल्या ऑफिसमध्ये आलीस ना? वरचा मजला आहे. हा नाही .
मी सदानंद गटणे भाव चेह-यावर घेऊन होते.
ऑफिस मध्ये गेल्यावर तिथल्या रिसेप्शनला त्यांनी माझी बॅग ठेवायला सांगितली .
दहा मिनिटांनी मी केबिनमध्ये गेले. आमच्या गप्पा झाल्यात. मुलाखत झाली. खाणं झालं. दोनदा चहा झाला.
मग त्या प्रेसिडेंटने विचारलं, कशी जाणार परत?
मी म्हटलं बसने?
नको, इतकी दगदग झाली असेल .
त्यांच्या एच आर डायरेक्टरना सांगून
त्यांनी कंपनीची कार आणि ड्रायव्हर पाठवून मला पुन्हा बसडेपोला ड्राॅप केलं. संध्याकाळी सहाची बस होती .
मुलाचं बारावीचं वर्ष होतं त्यामुळे शहर बदलणं कठीण होतं .मला पहायचं होतं की इतक्या गॅपनंतर मला मुलाखत देता येतेय का?
आज ते एच आर डायरेक्टर आणि प्रेसिडेंट आपुलकीनं बोलतात.
रिओ शहरातच काम करायचंय त्यामुळे पुन्हा त्यांना काॅल केला नाहीये पण मला कधीही कामासाठी नोकरीसाठी कोणत्या दरवाज्यावर नाॅक करावंसं वाटलं ब्राझीलमध्ये तथ सगळ्यात आधी मी त्या कंपनीत विचारपूस करीन.
सगळ्याच नोक-या मिळवायच्या नसतात.
न मिळालेल्या नोक-या आपल्याला माणसं मिळवून देतात. बस डेपो च्या चेंजींग रूममध्ये कपडे बदलले आणि मुलाखतीला तयार झाले.
कार्पोरेट कल्चर मधल्या सोफेस्टिकेशन ,स्पर्धेबद्दल बोललं जातं आज माणूसपणाबद्दल बोलूयात. वरच्या हुद्द्यावरील माणुसकी जपणारी कार्पोरेट जगातली माणसं 🤗 #मराठी माणसं.
#sulawrites #marathi #techmahindra #reposting
No comments:
Post a Comment