#traveldiary #starbuckscoffee #customerfeedback
थकला भागला जीव रात्री नऊ वाजता वाशीच्या रेल्वे स्टेशनवर आला आणि दोन टक्के मोबाईल चार्ज पाहून नेहमीच्या सवयीने स्टारबक्स मध्ये गेला.
मागच्या आठवड्यात असंच झालं होतं. तिथं काम करणारा विक्रांत हा मराठी मुलगा आणि संदिप हा हिंदी भाषिक मुलगा माझ्या मोबाईल चार्ज साठी काॅर्ड शोधत होते.
एक महत्त्वाचा फोन येणार होता.
काॅफी घेईपर्यंत फोन थोडा चार्ज झाला मग लक्षात आलं माझे क्रेडिट कार्ड्स तसेच राहिलेत फोनच्या कव्हरमध्ये. विक्रांतने ते सांभाळून आणून दिलेत.
मग मनसोक्त गप्पा झाल्यात मराठीत.
आज पुन्हा थकून भागून तिथे गेले.
सोयालात्ते घेऊन बसले तर विक्रांत आणि संदिप माझं प्रेझेन्ट घेऊन आलेत.
कोण कुठली मुलं!
मी सुद्धा कोण कुठली व्यक्ती.
गेल्या काही वर्षात तिथे गेले तेव्हा गप्पा झाल्यात. या मुलांनी लक्षात ठेवल्यात.
आज खुप त्रासून गेले होते. अख्खा दिवस भर उन्हात व्हिटी, नरिमन पाॅइन्टला होते. बरीच कामं होती.
स्टारबक्सच्या मुलांनी मला दिलेली भेट आणि केलेलं स्वागत अनपेक्षित होतं.
एनाराय म्हणून भारतात येते तेव्हा मानगुटावरून मिनरल वाॅटरच्या बाटल्या बाजूला काढल्यात की खरा भारत दिसतो.
माणूस म्हणून माणसावर प्रेम करणारी साधी माणसं.
असा भारत आपल्याला हवाय.
#crossculture #gratitude #sulawrites #marathi
No comments:
Post a Comment