वारा खात गारा खात
बाभूळझाड उभंच आहे..
लाॅकडाऊन मुळे अनेक जणांना सक्तीने उपाशी रहावं लागतं आहे.
काही दिवसांपूर्वी या बाभूळझाडाशी गप्पा झाल्या.
रिओ मधील एका मत्स्यालयाबाहेर 'झाड ' बनून हा बाबा न दमता पिपाणी वाजवतो.
कारण त्याने घातलेला हा पाना फुलांचा ड्रेस आणि हेल्मेटमुळे त्याला बोलता येत नाही.
फक्त लहानशी पिपाणी वाजवून तो संवाद साधतो.
तिथे जवळ एक डब्बा आहे.
त्यात लहान मुलं पैसे टाकतात. त्याच्याबरोबर फोटो काढतात बस्स हेच काम . सकाळी दहा ते संध्याकाळी सहा.
लाॅकडाऊन मधे हा बाबा आठवला.
जगभरातले बाबा आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतात. त्या सर्व बाबांना ही पोस्ट समर्पित 🙏😇
त्यांना विचारून हा फोटो काढला आणि व्हिडिओ केला.
हेल्मेट काढलं असतं तर जवळ असणा-या लहान मुलांना कळलं असतं ते human Being आहेत म्हणून हेल्मेट सह फोटो आहे.
उम्मीदोके सुखे आसमान का ये बरगद का पेड !😥
#crossculture #riodejaneiro #strongdaddy #marathi #sulawrites
No comments:
Post a Comment