Cultural intelligence

culturalintelligence बहुसांस्कृतिक बुद्धिमत्ता कशी अभ्यासायची ? 

याचा अभ्यासक्रम कुठे करायचा? 
यातली पदवी कुठे घ्यायची? 
एका पदवीत हा विषय शिकता येईल असं वाटत नाही. 
 बहुसांस्कृतिक बुद्धिमत्ता अभ्यासकाकडे काय असायला हवं? हा खरंतर यज्ञ आहे. यात वाचन, मनन,चिंतन आणि सामाजिक सांस्कृतिक निरिक्षण हवं. पर्यटक म्हणून नाही तर स्थानिक म्हणून ती संस्कृती समजायला हवी. समजा तिथे जाता येत नसेल तर त्या भाषेतील किमान पंचवीस तीस अनुबोधपट, सिनेमे, पुस्तकं असं बरंच वाचायला हवं. कल्चरल इंन्टेलिजन्स म्हणजे सिनिअर मॅनेजमेंटसाठी व्यवस्थापनाच्या अंगाने समजणारं सोपं मानव्यवंशशास्त्र . 

इथे वय हा फॅक्टर जमेचा आहे. 
माझ्या सारखी टिसीके व्यक्ती जी चार पाच देशात राहून आलीय ,भारतीय घेटोत राहिलेली नाही ( पर्यटक म्हणून जग न फिरता अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक होऊन राहिलिय ) तीला हा विषय वरच्या तुकडीत सुरू करता आला. 

SHRM Strategic people Management आणि Organizational Leadership Management या दोन्ही विषयात अलिकडे सहा सात वर्षांपासून कल्चरल इंटेलिजन्स या विषयावर भर देण्यात आला. 
कारण सोपं होतं.  
मल्टिनॅशनल कंपन्यातून जगभरातील माणसं एकत्र काम करू लागलीत.  
सिनिअर लिडरशीपसाठी ते आव्हानात्मक होतं. 
या सिनिअर लिडरशीपसाठी म्हणून Diversity, Acceptance , Inclusion, Equity याचं महत्त्व शिकवण्याचं काम होतंच होतं. 
नवीन एमबीए अभ्यासक्रमात म्हणजे अलिकडच्या काही वर्षांत या विषयावर विशेष लक्ष दिलं गेलं.  
पुर्वी एच आर मध्ये एमबीए होतं. Human Resources असं नाव होतं त्या शाखेचं.  
 पाच वर्षांपूर्वी एमबीए केलं ते Strategic people Management मध्ये. म्हणजे एच आर मधला माणूस बिझनेस मॅनेजमेंट मध्येही इनपूट देऊ शकेल असा अभ्यासक्रम करण्यात आला. 
हे ब्राझीलमधलं सांगतेय .
ते करत असताना Diversity Management ने माझं लक्ष वेधून घेतलं आणि त्याच विषयात सुपर स्पेशालिटी अभ्यास करावा असं मनात आलं.  
HBR Brasil च्या संव पावलो शहरात एक वर्कशॉप केलं याच विषयावर तेव्हा आणखी जाणवलं. हा तर माझाच विषय. 
तिथल्या प्रोफेसर वर्गाशी बोलले आणि त्यातून एकलव्याचा अभ्यास चालू झाला.  
आमच्या वाॅट्सअप ग्रुपने मला अनेक पुस्तकं सुचवलीत. अर्थात ती पोर्च्युगिझ/ पोर्तुगीज होती. बरीचशी विकत घेतली. आयपॅडवर वाचलीत.  
खरंतर हे निरंतर वाचन , निरिक्षण आणि अनुभव जगणं होतं.  
आजही आहे. 
एक आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगते. भारतातलं माहित नाही. 
ब्राझील मध्ये मानसशास्त्र या विषयातील पदवी घेणारे एच आर क्षेत्रात जातात. 
खरंतर मानसशास्त्र हा विषय नसेल घेतला तर एमबीए साठी प्राधान्य मिळत नाही. एच आर मध्ये. 
ज्याला काहीच येत नाही तो एच आर मध्ये आला असं होतं नाही. 
  
आजही ब-याच लोकांना हे समजत नाहीये आपण हा विषय का शिकायला हवा? 
यातून पैसे मिळतील का? 
पैसे मिळण्यापेक्षा नेतृत्वगुण निखरण्यासाठी. सर्वसमावेशकता वाढण्यासाठी जगभरातील सिनियर मॅनेजमेंट यावर कोचिंग घेतेय. अधिक वाचतेय.

#leadership #sulawrites #मराठी #peoplemanagement 

No comments:

Post a Comment

Popular choice

Working Woman and Biases

#workingwomen #biases  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...