आठ मार्चच्या निमित्ताने. फ्रेंच मानव्यवंशशास्त्रज्ञ या शब्दाचे मुळ अंगोला आहे असं म्हणतात. शब्दांच्या पलिकडील सांस्कृतिक जग.
मजूरांच्या - गुलामांच्या बोटी ब्राझीलला येत तेव्हा त्यांना हाच आपुलकीचा विरंगुळा होता. थकल्या भागल्या जीवाला मायेच्या स्पर्शाचा आधार.
दुस-यांचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्याच्या केसांतून हात फिरवायचा #culturalmagic
आज सकाळी ब्रेकफास्टसाठी या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे हा शब्द पुन्हा भेटला ( काफूने/ काफून ) #Cafune
#culturaltreasure
शब्द फक्त उच्चार किंवा काना मात्रा व्याकरण नसतं तर #संस्कृती असते.
आज अशाच एका ब्राझिलियन रोमॅन्टिक शब्दाबद्दल, प्रेमातल्या एका सहज सुंदर नजाकत असलेल्या नख-याबद्दल सांगायचंय.
नखरा म्हणण्यापेक्षा अदा म्हणूयात किंवा एकात्मता म्हणूयात ज्यात लय आहे आणि या ' कुणी छेडिल्या तारा ' अशी उत्कटता आहे.
देश बदलला की रोमान्सच्या त-हा बदलतात.
ब्राझीलमध्ये केसांना घेऊन एक मोठ्ठी बाजारपेठ आहे.
यात रोमान्सचा भाग आहेच.
कसा?
तर इथल्या रोमान्समध्ये सुळसुळीत , हेल्थी, खांद्यावरून खाली येणारे, समुद्राच्या लाटांप्रमाणे आणि नदीच्या वळणासारखे केस दिसतातच.
आफ्रो ब्राझिलियन लोकसंख्या देखील केसांचे असंख्य प्राॅडक्टस वापरते. किमान त्यांचे Identity असलेले Anthropological Afro hair type साॅफ्ट होईल आणि केसांना एक लय येऊ शकेल.
नॅचरल केस आत्मविश्वासाने कॅरी करतानाही त्यांची फार काळजी घेतली जाते.
केस बोलले पाहिजेत.
तुम्ही एकटे असा वा नसा पण केस सुंदर असले पाहिजेत म्हणून आबालवृद्ध स्त्रिया, पुरूष, तरूण वर्ग सर्व काळजी घेतात.
काफूने हा एक शब्द रोमान्स मधल्या एका अदेचा.
तुम्ही जर सहज आजुबाजूला पाहिलं कुणी जोडपी असतील तर तो पुरूष/ मुलगा/ तरूण त्याच्या जोडीदाराच्या केसातून हात फिरवताना दिसतात.
ती स्त्री/ मुलगी/ तरूणी देखील तसं करताना दिसते. सहज बोलता बोलता ही तसं करतील.
या अदेला काफूने म्हणतात.
कैफ वरून काफूने !
तर हा शब्द आला कसा ?
' मोकळ्या केसांत माझ्या, तू जिवाला गुंतवावे'
ब्राझीलमध्ये वारंवार पहायला मिळतं.
शुक्रवारी सलूनमध्ये इतकी गर्दी असते केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी.
बायका आधीच वेळ घेतात.
पुरूषही मागे नाहीत यात.
अगदी टक्कल पडायला लागलं तर मात्र सगळे केस कापतात ते.
तर काफूने म्हणजे simple act of Affection .कुणाचं तरी डोकं मांडीवर घेऊन त्याच्या केसांतून हळूवारपणे हात फिरवणे, इतकं साधं सोपं आहे हे.
This act has roots in intimacy and affection .
या शब्दाबद्दल इतक्या फिलाॅसाॅफीकल चर्चा झाल्यात. कवितांमधून हा शब्द अजरामर झालाय.
केसांचा Maid Top Knot म्हणजे बुचडा ( I found this word very harsh 😢) बांधून सहसा कुणी इथे दिसलं नाही मला.
केस मोकळे सोडणा-या स्त्रिया पाहिल्यावर पुन्हा संस्कृती आठवते.
एक साधीशी गोष्ट पण त्याकडे वेगवेगळ्या संस्कृतीकडून पाहिलं तर!!
आपल्याकडे सहज एखादा पुरूष म्हणला की लांब केस असलेली बायको हवी की त्याचा गंमतीत तात्विक शिरच्छेद झालाच समजा.
How dare you ? Expecting Long Hair ? सनातनी पुरूषी सगळी लेबल लागतील बिचा-याला. लोकांनी याला सामाजिक प्रश्न करून टाकलंय.
खरंतर केस वाढवणं कापणं यात वैयक्तिक आवड असली पाहिजे.
ते रंगवणं देखील वैयक्तिक आहे.
कोणत्यातरी इझमच्या नावाखाली केसांच्या लांबीवरून गुलामगिरीत अडकलोय असं नसावं नस्तंय.
केस म्हणजे अस्मिता नाही पर्सनल अभिव्यक्ती आहे.
#internationalwomensmonth
#crossculture #sulawrites #CQ #Marathi
No comments:
Post a Comment