मला माझं शहर आवडतं 🤗👏💃🇧🇷🏅🏌️♀️
शहर म्हणजे फक्त उंच इमारती आणि परदेशी पर्यटकांच्या नजरेतल्या झोपड्या नसतात. शहर त्यापलिकडे . तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनातली हक्काची जागा.
रिओ दि जनेरो हे शहर जिथे ढग खाली येतात. अटलांटिक समुद्राचं निळं पाणी भुरळ घालतं, देऊस अजूदा ( देव मदत करतोच, करेल) हा आशावाद लोकांच्या वागण्यात दिसतो.
धार्मिक शहर असलं तरी ती धार्मिकता कट्टर आंधळी बनून अंगावर येत नाही. तुमचं धार्मिक वेगळेपण स्विकारलं जातं.
तुमच्या यश अपयशाला समोर ठेवून गुड मॉर्निंग म्हटलं जात नाही. समुद्र किनाऱ्यावर सगळेच सारखे म्हणत व्हिजिटिंग कार्ड घराच्या उंबरठ्याच्या आत ठेवत कमावलेलं उत्तम शरिरसंपदा घेऊन लोक बाहेर पडतात. पैसे असतातच पण त्यामुळे मिळालेलं नाव लौकिक आणि आदर किनाऱ्यावर काय उपयोगी?
रिओ शहराचा हा गुण आवडतो. रंगभेद, वर्गभेद, शिक्षण आणि सामाजिक स्थान लाटांमध्ये वाहून जातं.
हे शहर माणसं घडवतं. माणूस म्हणून जगायला बळ देतं.
माझ्या पुस्तकाच्या ऋणनिर्देशात रिओ शहर पहिल्या रांगेत असेल इतकं माझं या शहरावर प्रेम आहे.
कवी बोरकरांच्या शब्दात सांगते,
माझ्या रिओच्या भूमीत
सागरात खेळे चांदी
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी!!
शहरात स्वप्नं असतात आणि स्मृती देखील. 'इश्क में शहर होना' काय आणि 'तेरा शहर कितना अजीब हैं ' या सारख्या त्सुनामी न टाळता येण्यासारख्या.
' उसके शहर का तो पानी भी नशा देता है ' असं प्रत्येकाला म्हणजे जो जिंदादिल आहे अशा व्यक्तिला म्हणायला लावणारं हे रिओ शहर. महानगर होऊनही महानगराची घाई अंगाला लावून न घेणारं.
' गाव से शहर तक कडवे सारे नीम 'असं कधी म्हणावसं वाटतं तेव्हा अस्ताला जाणारा सुर्यास्त पहायचा आणि पुन्हा नव्या सकाळची वाट पहायची.
माझ्या नजरेतून रिओ शहर नक्की पहा 🙏💃
प्रत्येक शहराची स्वतःची अशी ओळख असते. टोकियो शहरात घराच्या बाल्कनीला मोकळं ठेवायला सांगायचेत. मुंबईत माझ्या सोसायटीत आम्हाला सोसायटीच्या सौंदर्यात आणि Architecture मध्ये बेढब दिसेल असं काहीही करण्याची परवानगी नाही.
घराला असणा-या खिडक्यांची साईज, बाल्कन्या, व्हरांडे आणि तुमच्या शहराचं तापमान याचा संबंध आहेच.
मुंबईचं उदाहरण देत नाही कारण मुंबई शहर बेटावरचं शहर आहे. जागा आणि लोकसंख्येचा मेळ नाही.
समाजशास्त्रज्ञ Cultural Geography चा अभ्यास करतात तेव्हा अनेक मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. रिओचं तापमान मुंबईसारखं असूनही घरांची रचना आणि बाल्कनी कल्चर भिन्न आहे. इथे कुणी बाल्कनी लोखंडी जाळ्या लावून पॅक करत नाहीत. स्लाईडिंग असतात काचेच्या पण त्यात लोखंड दिसत नाही फ्रेममध्ये. बालक्नीचा वापर रिलॅक्स होण्यासाठी होतो.
त्याचप्रमाणे स्विमिंगपूल कल्चर आहे. अगदी Humble उपनगरात देखिल सोसायटीत स्विमिंगपूल असतो. काहींच्या घरात देखील. त्यासाठी फार पैसेवाले असण्याचं कारण नाही. दर्यावर्दी पोर्तुगीजांनी त्यांचं समुद्रावरचं, पाण्यावरचं प्रेम ब्राझिलियन लोकांना भेट दिलं असावं.
एकाच शहरात वाढूनही आपल्या वाट्याला आलेल्या शहराचा तुकडा सारखा नसतो. काही काहींसाठी, गाव से शहर तक कडवे सारे नीम असतात ' काहीं साठी आमराईचा रस्ता.
रिओतल्या घराच्या बाल्कनीतून एका Random सकाळी चहा घेता घेता काढलेला नो फिल्टर व्हिडीओ.
इथे LinkedIn वर मराठीत लिहितेय, भारतीय प्रादेशिक भाषेत लिहितेय पण शौक तो हम भी बडे ही पालते हैं. मग ते घर का असेना.
#marathi #sulawrites
No comments:
Post a Comment