आज का स्टोरी क्या है? #crossculture #UTV
एका दिल्ली दुरदर्शनसाठी असलेल्या टाॅक शोच्या मुख्य रिसर्च टीममध्ये काम करत होते. त्याआधी मुंबई दुरदर्शनच्या वाद संवाद कार्यक्रमासाठी बराच काळ काम करत होतेच.
मंदिरा बेदी या शोची होस्ट होती.
माझ्याबरोबर इतर रिसर्चर होते. प्रत्येकाला एक एक स्पेशलाईझ्ड beat पहायचा होता.
1998 / 99 .
एक समाजसेविका पॅनेलिस्ट होती.
विषय- तृतिय पंथीय आणि त्यांचा स्विकार.
ही जी तीस एक वर्षांची तरूणी होती ती दोन मुलांची आई होती आणि तृतिय पंथीय व्यक्तींना संघटित करून त्यांच्यासाठी हेल्पलाईन चालवत होती.
मंदिराला सगळं ब्रिफिंग केलं.
काय विषय आहे? कोण बोलणार आहे सगळं दळण चालू झालं होतं. दिवसाला दोन एपिसोड व्हायचेत. प्रेक्षक सुद्धा आणायचं काम करायचो. सेलिब्रेटिज साठी लगेच प्रेक्षक मिळायचेत पण हुंडाबळी, जाळपोळ, घरगुती हिंसाचार साठी कमी काऊन्ट असायचा.
साकिनाक्याला एक नातेवाईक नगरसेवक होते. त्यांच्या बायकोकडे मी अनेकदा जाऊन रडायचे. कार्यक्रमात महिला वर्ग हवाय. त्या नेहमी coordinate करून द्यायच्यात.
तर ही मालवणीतील समाजसेविका खुप उत्साहाने आली होती .
तिची ठेवणीतली साडी नेसली होती.
दिदी, मेरा मेकप, हेअर सब करेंगे आप?
इतर सर्व मुलाखतकारांप्रमाणे तीचंही हेअर, मेकप करते म्हटलं .
यथावकाश तिची हेअरस्टाईल झाली.
थोडा उंचावर बांधलेला अंबाडा. पुढे आलेली केसांची बट, जी कानामागे घेता येत होती.
साड्या ती घेऊन आली होती.
तिच्या नव-याने ही मुलाखत पहायला हवी असं ती म्हणत होती.
मै भी सुंदर दिखती ना, दिदी! असं माझ्याकडून वदवून घेत होती.
त्याआधी दोन दिवस माझा फोन सतत वाजत असे. ती घरी फोन करून विचारायची, कोणती साडी, कसे केस हवेत.
मुलाखतीसाठी मंदिरा समोर तालमीसाठी आली. एक जुजबी ओळख करून द्यायची होती आधी एकदमच कट् नको म्हणून.
मंदिरा तयार झाली.
ही समाजसेविका, इतर काही तृतिय पंथीय सगळे तयार होते.
एक असिस्टंट डायरेक्टर की प्राॅड्कशन वाली आली.
ती मेकअप रूमच्या बाहेर होती. मला म्हणाली, इनको क्यों मेकअप करनेका?
झोपडपट्टी वाले है. नॅचरल लुक है तो लोगोंके सच लगेगा.
जितने पुराने कपडे, उतना अच्छा.
स्टोरी में दुख दर्द दिखना चाहिये!!
मला हे पटत नव्हतं.
तीला हे पटत नव्हतं की समाजसेविका सुरेख दिसत होती.
तिने इंग्रजीत बोलून दबाव आणून तिला साडी बदलायला सांगितली, केसांचा शेपटा केला.
समाजसेविकेचे माझ्या कॅमे-याने फोटो काढलेत तिच्या नव-यासाठी.
मग तिला जुजबी कारण दिलं की साडीचा रंग फिका हवा. केस जरा वेगळे.
हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी.
त्या बाईच्या डोळ्याला डोळा देऊ शकले नाही. तिचा अंबाडा सुटताना पाहून ,चापून चोपून नेसलेली साडी सोडताना वस्त्रहरण झालं खरंतर माझं. तीला आशा दाखवली होती. मनात अपराधी वाटणं होतंच.
आज हा किस्सा आठवला की वाटतं आपण समाज म्हणून हे सर्व ठरवून टाकलंय का? कुणी कसं दिसलं पाहिजे? कसं दिसायला हवं?
समाजसेविका किंवा तळागाळात काम करणारे कार्यकर्ते यांनी गबाळं का दिसायला हवं? कळकट मळकट कपडे का घालायचेत? आपल्या डोळ्यांना ही सवय का?
असे ड्रेसकोड कोण ठरवतं?
एक बुद्धिमत्ता विशेष मानली जाते गेल्या पंचवीस एक वर्षात यावर संशोधन होतंय.
#AppearanceIntelligence
पेहरावासाठी असलेली बुद्धिमत्ता.
त्यावर कुण्या एका वर्गाची मक्तेदारी नाही.
चष्मे बदलायला हवेत. सोच बदलो, बदलेगा भारत.
( या फोटोत माझ्या सोसायटीतले वाॅचमेन आणि मी एकाच ड्रेसकोड मध्ये आहोत)
#empathymatters #sulawrites #marathi #मराठी #acceptance
No comments:
Post a Comment