Cultural Geography

Cultural Geography. गेले काही वर्षे मी याच विषयावरचे पेपर्स वाचतेय. लोकांना भेटतेय. बोलतेय. टुरिस्ट म्हणून नाही तर लोकल म्हणून. भुगोलाचा अभ्यास तोही संस्कृतीच्या अंगाने. का बरं करायचा हा अभ्यास? Human Geography समजून घेताना आपल्याला सांस्कृतिक दृष्ट्या भौगोलिक महत्व जाणून घ्यायचंय. 

आपण ज्या शहरात, गावात, जागेत वाढलो किंवा ज्या नैसर्गिक वातावरणात वाढलो त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. आपण ज्या सामाजिक प्रतिक्रिया देतो किंवा जसे रिस्पाॅन्ड करतो यावर आपल्या भौगोलिक स्थानाचा प्रभाव आणि पगडा असतो. 
एकोणिसाव्या शतकात हा अभ्यास सुरू झाला. मानव्यवंशशास्त्राची ही एक तुलनेनं नवीन शाखा असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे कारण यात, माणसं अशी का वागतात? अशीच का वागतात याचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करता येऊ शकतो. 

व्यक्तीच्या सवयी, तो पाळत असलेले सणवार, कुळाचार, चालिरिती, भाषा, धर्म विषयक मतं, आर्थिक स्तर, कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संगीताची जाण/आवड/कान,लोकांचं भौतिक साधनांकडे पाहण्याचा नजरिया, Material expressions of people , जागेसाठी ( गावासाठी/ मातृभूमी) असलेली अस्मिता-अहंकार-आत्मियता-आस्था-आपुलकी, लोकांशी कनेक्ट होताना संवाद साधतानाची एक्सप्रेशन्स, शारिरिक हालचाली, घरांची रचना, घरांची व्यापलेली जागा, पर्यावरण, शेती, भुभागाचा विकास आणि त्याचा व्यक्तिवर झालेला परिणाम, घरातलं फर्निचर, त्याची रचना, वापर, मुबलकता, पुस्तकांची जागा, स्वयंपाकघरात वापरले जाणारे पदार्थ, वाढण्याची पद्धत, ज्ञानाची निर्मिती कशी करतात किंवा संवाद साधताना कसा आचार विचार असतो, सरकारची भुमिका किंवा त्या भौगोलिक पट्ट्यात असलेल्या सरकारची कार्यप्रणाली या आणि अशा ब-याच बाजूंचा अभ्यास कल्चरल जिओग्राफी या विषयात केला जातो. 

बहुसांस्कृतिक बुद्धिमत्ता या विषयाला पुरक असल्याने मी हा अभ्यास करतेय. माझ्या consultancy साठी मला याची उपयुक्तता जाणवते. 

#sulawrites #crossculture #marathi #मराठी #peopledevelopment 

No comments:

Post a Comment

Popular choice

Working Woman and Biases

#workingwomen #biases  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...