First assignment as a photographer

When freedom, passion and profession go hand in hand.

 
गुगलमॅपसाठी फोटो काढायला आवडतात . Reviews लिहायला आवडत नाही . निगेटीव्ह reviews लिहिता लिहित नाही कारण आपली मतं बदलतात . आपल्या एका नकारात्मक मता मुळे कुणाच्या पोटावर पाय येता कामा नये.
बाकी फोटो काढायला आवडतात.
पहिली मोठी असाइनमेंट होती शाहिर दादा कोंडके यांच्या अंत्यसंस्कारासाठी. त्यांचं पार्थिव नेलं त्या ट्रक च्या ड्रायव्हर बसतो त्या टपावर बसून फोटो काढले होते.  तेव्हा #लोकमत ची चित्रगंधा पुरवणी औरंगाबाद मधून निघायची. अतुल कुलकर्णी पुरवणी  संपादक होते. फोटो काढून दादरच्या कबुतर खान्याजवळच्या एका फोटो स्टुडिओत धुवून ट्रेन पकडून चर्चगेटला उतरून पंधरा मिनिटं मित्तल टाॅवर पर्यंत चालून मुंबई #Lokmat ऑफिसमध्ये नेऊन देणं असा द्राविडी प्राणायाम होता खरंतर. 
तेव्हापासून आतापर्यंत फोटो काढतेय.  फोटोग्राफी मागे पडली केव्हाच कारण लिहिण्यावर वाचन वाढविण्यासाठी आणि  फिरण्यावर फोकस होता / आहे. 
मग 2015 साली इन्स्टा जाॅईन केलं. तिथून पुन्हा फोटो काढायला लागले.  2016 ला गुगल लोकल गाईड म्हणून फोटो टाकायला सुरूवात केली.  तब्बल सात हजार फोटो झालेत आतापर्यंत.

सगळीच कामं पैशांसाठी करू नयेत.
Second Photo is of a Street Girl . when I brought my new Android phone . I wanted to Click first memorable photo . This cute princess was outside the showroom was equally curious about my phone . I thought of clicking this selfy . first photo .

#आनंदाच्याडोहीआनंदतरंग #sulawrites #marathi #googlemaps

No comments:

Post a Comment

Popular choice

Working Woman and Biases

#workingwomen #biases  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...