I choose Basketball at school and Badminton in our Colony.
Ended up with Gold in a Mix Doubles(Inter College competition)
त्यानंतर बास्केटबॉल मागे पडला आणि बॅडमिंटन सोबत राहिलं. लग्नानंतरही नव-याला हा गेम शिकवला. लेकाला शिकवला. शांघायमध्ये राहत असताना आमचा साऊथ इंडियन ग्रुप होता जो रोज दोन तास बॅडमिंटन खेळत असे.
रिओत आल्यावरही हा गेम खेळत राहिले. आता बॅडमिंटन कोर्ट इथून पंधरा किलोमीटर दूर आहे तरीही तंगडतोड करून जातेच. ऑलिम्पिक साठी Volunteer म्हणून काम करायला मिळालं तेव्हा टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिससाठी काम केलं.
खेळाडू असणं फक्त पदक मिळवून देण्यासाठी नसतं. आयुष्याच्या खेळात खिलाडूवृत्ती जपण्यासाठी कोणतातरी गेम खेळायला हवाच. ऑफिस पाॅलिटिक्स, किचन पाॅलिटिक्स या पलिकडे खेळ खेळायला हवेत. माझा वैयक्तिक अनुभव आहे. खेळाडू असणं आपल्याला कणखर आणि लवचिक बनवतं.
सुदैवाने माझ्या घरात सद्या आठ हौशी खेळाडू आहेत. वय वर्ष नऊ पासून ते साठ पर्यंत.
वयाच्या एकावन्नाव्या वर्षी फिटनेस सांभाळताना कृतज्ञतापूर्वक सांगावसं वाटतंय.
( हा फोटो रिओत घर बदललं तेव्हाचा. सामानाचा टेम्पो गेल्यावर सगळ्यात शेवटी माझ्या #Yonex च्या बॅडमिंटन रॉकेट्स जपून कॅरी केल्यात)
लोकांना आपल्या आयडॉल्सना भेटायचं असतं यात राजकीय नेते असतात. सिनेमातले कलाकार असतात. मला #leechongwei #lindan यांना एकदा तरी भेटायचंय. थोडंफार मंदारिन बोलता येतंच आहे. काॅफी घेता घेता किंवा चायनीज चहा घेता घेता संवाद साधता येईलच.
No comments:
Post a Comment