यात शाडूची गणेश मूर्ती हमखास खंडित होत होती. तीनदा तसं झालं मग विचार केला स्वतःच मुर्ती बनवुयात. रिओ दि जनेरो शहरात भारतीय तसे कमी राहतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतके. सद्या तर महाराष्ट्राचा भगवा माझ्याच हातात आहे.
मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मोहिनी जाता जात नाही.
सहा वर्षांपूर्वी स्वतः गणपती बनवायचा ठरवला. उरूग्वे ची एक शिल्पकार स्नेही होती. तीचा क्लास लावला. महिन्याभरात गणपती करण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवात बसवता आला नाही कारण मुर्ती डिसेंबरमध्ये घडवली. आपल्याला मातीतून काही घडवता आलं याचं समाधान होतंच. ही मुर्ती नंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीला भेट म्हणून दिली.
नंतरच्या भारत भेटीत मुंबईहून शाडूची मुर्ती आणली खास.
#emiratesairline च्या काऊंटरवर एक मराठी मुलगा होता त्याला म्हटलं, गणपती आहे सोबत. मला एखादं सीट जास्त देतोस का? आजुबाजूला कुणी नको कारण संपूर्ण प्रवासात मुर्ती मांडीवर घेऊन जाणार आहे. शाडूची मुर्ती नाजूक आहे. खंडित नको व्हायला. सीट अपग्रेड साठी पैसे नाहीत. इकाॅनाॅमीत काय जुगाड होऊ शकतो?
मी पाहतो काय ते, असं म्हणून त्याने आणखी गप्पा मारल्यात. बोलताना तो सुद्धा चार बंगला इथे राहणारा निघाला म्हणजे माझ्या माहेरच्या काॅलनीत. विमानात माझं सीट शोधलं.
#storytime
लहान मुलीसारखे क्राॅस फिंगर्स करून बसले. मनातल्या मनात माझ्या शेजारी कुणी नको असं बडबडत होते. एरव्ही माझ्या शेजारी फक्त आणि फक्त कुणी टाॅल ,डार्क /फेअर /ब्राऊन /यलो आणि हॅण्डसम ' बसावा म्हणून देव पाण्यात ठेवते पण त्या दिवशी तिन्ही सीट मला एकटीला हव्या होत्या .
' कुर्सी की पेटी' बांधा असं सांगे पर्यंत जीवात जीव नव्हता. अचानक टाॅयलेटमधून कुणी उगवायचं आणि बाजूला येऊन बसायचं ही सनातन Recurring भिती होतीच.
पण गणपती पावला 🙏
माझ्या शेजारच्या दोन्ही सीट रिकाम्या होत्या. त्या मुलाने मदत केली. पुणे ते मुंबई ते दुबई ते रिओ गणपतीबाप्पा स्वतंत्र सीटवर विराजमान होऊन आलेत.
शाहरूख म्हणतो ते खरंय, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो वो मिल जाती है.
#मराठी #sulawrites #crossculture #marathi #journey
No comments:
Post a Comment