असाई हे एक पाम फ्रुट आहे.
उन तापलं की समुद्र किनारी बसून नारळ पाणी ( तेही फ्रिजर इतकं थंडगार) आणि असाई घ्यायची.
बियर इतकंच हे पेय प्रिय आहे इथे.
कधीकधी डिनरच्या ऐवजी मी फक्त 450 ग्रॅम असाई खाते.
यात हवे तेवढे उष्मांक तर मिळतातच पण सोबतीला अनेक फायदे आहेत.
या फळावर संशोधन चालू आहे.
दक्षिण अमेरिकेतील महत्वाचं फळ आणि पेय आहे हे.
दर दिवसाआड आम्ही असाई खातोच.
या फळाची टेस्ट लगेच विकसित होत नाही कारण त्याला स्वतःची अशी चव नाही.
सोबरेमेसा अर्थात ब्राझिलियन गोडाचे पदार्थ .
ब्राझिल म्हटलं कि फुटबाॅल , सांबा , बिकिनी घातलेल्या स्त्रिया , बियर घेवून नाचणारे लोक , भव्य दिव्य कार्निवल आणि कडू कॉफी आठवते.
गेले आठ वर्ष मी ब्राझिल मध्ये राहतेय मला जे ब्राझिल रोजच्या आयुष्यात भेटतेय ते या पलीकडचे आहे .
आचार विचार राहणीमान जेवण खाण सगळ्यात स्वतःची अशी परंपरा आणि ज्या ज्या राज्यकर्त्यांनी इथे येवून राज्य केले त्यांच्या स्वयंपाकाची चव , त्यांचे जिन्नस , पदार्थ घेवून दुधात साखर मिसळावी तसं सगळ्यांनी प्रभावित होऊनही स्वतःची अशी वेगवेगळी पक्वान्नं ठेवणारं ब्राझिल मला दिसलं.
ब्राझिलच्या खाद्य संस्कृतीचा विचार केला तर त्यावर प्रबंध होवू शकतो. कारण पोर्तुगीज ,जपानी , आफ्रिकन , इटालियन , पोलिश , स्पानिश ,जर्मन, स्विस ,लेबनिझ अश्या प्रभावांमुळे त्यांच्या खाद्यपदार्थांची इथे रेलचेल होती . जे इथे पिकत नव्हते ते उस मळ्यात काम करणाऱ्या परदेशी मजुरांनी सोबत आणले. मजूर , कामगार म्हणून आलेले परदेशी इथे राहताना आपापल्या देशातील पदार्थांनी चव इथे घेण्याचा प्रयत्न करीत होते. जोडीला त्यांच्या पदार्थांचे गठबंधन होतेच . वसाहतकारानी आपले पदार्थ आणलेत.
मुळच्या ब्राज़िलिअन असलेल्या असाई , केळे, नारळ ,आंबा , पेअर , पीच , भोपळा , रताळे , अंजीर ,पपई ,माराकुजा , काजू , ग्वाराना , पेरू , अननस , प्लम , संत्रे , मोसंबी , उसाचा रस , गुळ , अवाकादो ह्या सगळ्याचा वापर इथल्या गोडाच्या पदार्थात होत होता जोडीला परकीय वसाहतींमुळे दुधाच्या पदार्थांचा वापर होत गेला .
लिंबाचा रस , शेंगदाणे , मक्याचे दाणे , पीठ , साबुदाणा , इथे मिळत असलेले कंद सगळे काही गोडाच्या पदार्थात एकरूप झाले . दालचिनी चा वापर हि मोठ्या प्रमाणात झाला . जायफळ वापरले गेले .
फळांचा वापर करून बनविलेले केक तर ब्राज़िलिअन घरात दर आठवड्याला बनतात . म्हणजे आपण जितक्या सहजपणे शिकरण बनवू तेवढ्या सहजपणे केक बनविले जातात .
गाजराचा केक , भोपळ्याचा केक , केळ्याचा ,मक्याच्या पिठाचा , आंब्याचा सोयाबीन च्या पिठाचा , माराकुजाचा , लोण्याचा , बटरचा , पपयीचा , ताज्या किसलेल्या नारळाचा , संत्र्याचा , कोको चा . इथे उपलब्ध असेलल्या यच्चयावत फळांचा केक बनविला जातो .
इतकेच काय तर इथे पिझ्झा सुद्धा गोड असतो. म्हणजे केळ्याचा पिझ्झा , चोकलेट चा पिझ्झा , आंब्याचा पिझ्झा आणि वरून दालचिनी किव्हा जायफळ .
इथे असे म्हटले जाते कि सोबरेमेसा खाताना जितका बिझनेस केला जातो तितका बिझनेस प्रत्यक्ष कामाच्या तासात केला जात नाही. किंवा त्याबद्दल आवडीने बोलले जात नाही. इतके ब्राज़िलिअन माणसाला गोड खाणं आवडतं .त्यामुळे गोड खाता खाता तो त्याच्यासाठीच्या रटाळ विषयावरही बोलतो.
#crossculture #acai #sulawrites #marathi
No comments:
Post a Comment