देवा सरु दे माझे मी पण

देवा सरू दे माझे मी पण 🙏
परदेशात राहत असलो की म्हणजे अशा देशात जिथे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके ही महाराष्ट्रियन राहत नसतील तर ?
भारतीय सण ,उत्सव Only Me mode मध्ये साजरे होतात. 
 या वर्षी गणेश चतुर्थी आणि माझी युके व्हिझा मुलाखत एकाच वेळेस आहे. 
दर वर्षी काही ना काही अडचणी येतातच. कधी शाडूची मुर्ती नसते, कधी पूजेचं साहित्य. मखर तर कधीच मिळालं नाही गेल्या आठ वर्षांत. डोक्यावर छत्री नाही धरता आली की बसायला छानसा चौरंग देता आला नाही😢
कधी मोदकाचं पीठ मिळत नाही मग ब्राझीलचा गोडाच्या पदार्थांचा राजा ब्रिगादेरो गणपतीच्या हाती मोदकाच्या जागी जाऊन विराजमान होतो. शेवटी भाव महत्वाचा. 
ही फोटोतली मुर्ती शाडूची आहे. पुणे, मुंबई, दुबई, संव पावलो रिओ असा थांबत थांबत प्रवास करत आलीय ती ही हातात घेऊन आलेय कारण लगेजमधून मुर्ती खंडित होत होती. 
एमिरेटच्या काऊन्टरवर मराठी मुलगा होता मुंबईत. त्याला म्हटलं मुर्ती हातात नेतेय. इकाॅनाॅमीचं तिकिट आहे. शेजारचं सीट खाली राहू शकतं का? 

 तो तरूण डि एन नगर परिसरातील होता म्हणजे माझ्याच माहेरचा. त्याने शेजारच्या दोन्ही सीट खालीच ठेवल्यात. 
गणरायाचं आगमन ऐसपैस झालं शिवाय सगळ्या फ्लाईटमध्ये परदेशी लहान मुलं, स्त्रिया ' गणेशा, गणेशा ' म्हणत कौतुक करत होत्या ते वेगळंच. 
या वर्षी पाहूयात काय होतंय ते?
ब्राझील मध्ये गणेशाच्या पितळी मुर्ती सहज उपलब्ध आहेत.
गणेशा, बुद्धा, महात्मा गांधी या तिघांच्या मुर्ती, फोटो गिफ्ट शाॅप्समध्ये सहज दिसतात. 
माझा आग्रह शाडू किंवा मातीच्या मुर्तीचा असतो त्यामुळे निवड करता येत नाही. 

या पोस्टच्या कमेन्टमध्ये ब्राझीलमधील गोडधोडाच्या पदार्थांबद्दल काही लिहिलंय. दुर्दैवाने ब्राझीलकडे फार Stereotype नजरेतून पाहतात. सांबा, फूटबॉल, कार्निवाल, समुद्र किनारे, ब्राझीलमधल्या तरूणी ही या देशाची ओळख नाही. 
गणपतीत जर ब्राझिलियन गोडधोड करायचं म्हटलं तर अगदी सहज छप्पन भोग करता येतील इतकी विविधता या देशात आहे. 
#crossculture #brazil #foodculture 
#sulawrites #marathi #ganesha 

No comments:

Post a Comment

Popular choice

Working Woman and Biases

#workingwomen #biases  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...