How you look at the Rain is also part of a #Culturalinterpretation Being an Indian Living In Rio, lived in Japan and China . Here are some #wordmagic about Rain in Japan.
पन्नास प्रकारे पडणारा जपानी पाऊस.
भाषेचे सौंदर्य ती भाषा शिकल्याशिवाय नाही कळत .
आता जपानी भाषेचेच पहा . नुसता पाऊस पडतोय हे जपानी माणूस ते पन्नास पद्धतीने सांगू शकतात . हो त्यासाठी त्यांच्या कडे तसे शब्द आहेत .
जपानी भाषेत पावसाचे वर्णन पन्नास शब्दात करता येते . पाऊस कसा , केव्हा कित्ती पडतो त्यावर त्याला नाव दिलेले आहे . अशी पन्नास नावे आहेत . पाऊस , पावसाची वेळ , पावसाची तीव्रता , त्याचा वेग , पावसाचा गारवा थंडावा ह्यावर तो कोणत्या प्रकारचा पाऊस आहे हे वर्णिले जाते .
थोडे सोप्पे करून सांगते .
' #雨 ' या चित्राचा अर्थ आहे पाऊस . छत्रीचा आकार आणि त्यात पावसाचे थेंब . उच्चार आहे 'आमे '. आता मी जर '大雨 ओआमे 'म्हटले तर तो होतो जोरजोरात पडणारा पाऊस . 'शिन्तोत्सुकामे 'म्हटले तर तो होतो तीव्रतेने पडणारा पाऊस . 'साय्यू 'म्हटले कि होते भुरभुरणारा , 'कोनुकामे 'म्हटले तर मापात पडणारा . '風雨 फू 'म्हटले तर वारा आणि पाणी, 'आमेनुचीयुकी' म्हटले तर पावूस मग बर्फ ,'युकी माजिरि 'म्हटले कि आधी बर्फ आणि मग पाऊस .
'雨露उरो 'म्हटले कि पाऊस आणि मग दव
'हारेनोची आमे 'म्हटले कि आधी सर्व निरभ्र आकाश आणि मग येणारा पाऊस .
'涼雨 रयोयू 'म्हणजे थंड गार पाऊस आणि
'冷雨 रेयू 'म्हटले कि कुडकुडत गारवा आणणारा पाऊस ,
' 五月雨 सामिदारे ' म्हटले उन्हाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पावूस , ' 秋雨आकी सामे ' म्हटले कि autumn मधला पाऊस ,
'युदाची ' म्हणजे संध्याकाळचा अचानक आलेला पाऊस , 'नागामे 'म्हणजे बराच वेळ पडणारा ,
'आमागिरी 'म्हणजे पावसानंतरची तऱ्हा ,'十雨ज्युउ' म्हणजे दहा दिवसात एकदा पडलेला प्रसन्न करणारा पाऊस ,'夜雨 याउ 'म्हणजे रात्री पडणारा पाऊस.
आहे न गम्मत ! जपान सोडून कितीतरी दिवस झालेत पण जपानी भाषेचे वेड काही कमी होत नाही.
( मला फार उत्तम जपानी भाषा येत नाही आता. सराव कमी पडलाय. माझ्या कडून चुकीचे उच्चार लिहिले असल्यास ते दुरूस्त करावेत )
petrichor मृदगंध
/ˈpɛtrʌɪkɔː/
noun
a pleasant smell that frequently accompanies the first rain after a long period of warm, dry weather.
Gráfica credits American Chemical society.
Video from our Residence 🏡
#Marathi #firstrain #vacationvibes
No comments:
Post a Comment