भारत म्हणजे साधू, भस्म, टिळे, भगवी उपरणं, धोतर ,जटा, डोंगर, जंगल, योगा, गंगा आणि बरंच काही स्टिरिओटाईप. केस रंगवण्यासाठीचा हा एक ब्रॅन्ड आहे. सुर्या ब्राझील ही कंपनी. वाईनच्या रंगाची मेहन्दी. म्हणजे केसांना लावण्याचा रंग. माॅडेल कोण तर विश्वामित्र सर की काय? माझा चष्मा कुठेय?
सोबत मेनका मॅम आहेत.
त्या बहुधा लाजत आहेत. कमरेतून लचकल्यात म्हणजे उत्कट क्षण असावेत.
पांढरी दाढी असणारे एक साधूबुवा त्यांची पत्नी, प्रेयसी किंवा ऑफिस सहकारी केसांच्या जाहिरातीत पोझ देत आहेत.
रंग दे चुनरिया म्हणत आहेत असं उगीच वाटंतय मला.
हे असं प्रतिनिधित्व पाहून वाईट वाटतं.
हा भारत अनोळखी आहे म्हणजे साधू आहेत आपल्याकडे.
केसही रंगवत असतील.
अशा जाहिराती पाहिल्यात की
cultural intelligence किती महत्वाचा विषय आहे हे समजतं.
#crossculture #sulawrites #marathi
No comments:
Post a Comment