beingrelevant मुसाफिर तो सभी बनते हैं ,कभी कभी खुद ही यात्रा बनने की कोशिश करनी चाहिये !
Getting old , going silver is not an issue .
वय वाढणं , केस पांढरे असणं आणि ते काळे करणं किंवा चाळीशीच्या पन्नाशीच्या साठीच्या पुढे असणं यात अनुभवांची समृद्धी असते .
प्रत्येकाच्या आजुबाजूला या वयोगटातील कुटुंबातले सदस्य असायला हवेत. मित्र मंडळी असायला हवीत.
वयोगट आणि विविध सामाजिक स्तरावरील व्यक्तिंशी बोलचाल असली तर आपली स्वतःची अशी personality आकाराला येते.
Cross culture Metacognition साठीची प्रयोगशाळा आहे ही.
Getting old is not an issue but Being Relevant is Important.
हे Being Relevant असणं आपल्याला माणूस म्हणून साॅफ्ट स्किल्स शिकवतं.
जे माझ्या आयुष्यात घडत नाही ते चुक नसतं पण तसंही घडतं. हे घडताना विशिष्ट वयोगटातील व्यक्ती कशा react करतात?
आपण विद्यार्थी असलो की आपलं आकलनात वाढतं.
अच्छा, हे असंय होय! असंही असू शकतं तर? मी या बाजूने कधी विचारच केला नाही.
Being Relevant साठी फार गुंतवणूक नको. फक्त कान, डोळे, मन , बुद्धी आणि हृदय यांची दार सदैव उघडी हवीत.
#Empathy हवी इतरांना समजून घेण्यासाठी.
कडवटपणा न ठेवता आपलं मत कायम ठेवून ऐकता आलं पाहिजे.
लोकेशन महत्वाचं असतं.
जसं माझं तसं इतरांचं. कुठेतरी एखादा ब्रिज सापडतोच.
तो सुटू द्यायचा नाही . तोल जातोय असं वाटलं की तो पकडायचा नात्यातल्या समतोलासाठी.
कठिण नाही आहे. स्टिरिओटाईप मतं बदलता आली पाहिजेत. मनात ही लवचिकता रातोरात येणार नाही.
त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील जातीतील, धर्मातील व्यक्तींना भेटायला हवं.
कचाकचा चर्चा करायची गरज नाही प्रत्येक भेटीत.
आता काय वाचतोय?
काही वाचलंत तरी आहेस सद्या?
काय पाहतोस? हे पहाच.
ठीकाय म्हणायचं.
समजा समोरच्याला अभिप्रेत असलेलं आपण वाचलेलं नसलं तर तो पेट्रोलच्या उपड्या केलेल्या ड्रमावर उभा राहणार आणि दवंडी पेटवणारच .
त्याचं वागणं टाळता येणार नाही आपल्याला.
हे बाय प्राॅडक्ट तर टाळता न येण्यासारखं आहे.
तरीही उत्तर द्यायचं नाहीच.
ठिणग्या, अस्मितेच्या लढाया गंगेत बुडवायच्यात.
फक्त ऐकायचं.
मत द्यायची गरज नाही.
शांत बसणं हे सुद्धा एक निवेदन आणि भुमिका असते.
डोमेन वेगळं असतं तेव्हा
Relevant असणं म्हणजे श्रोत्याच्या भुमिकेत शिरणं.
आपल्याला जे काही येतं ते सगळं आपण सोशलमिडियावर सांगत नसतो किंवा इतरांना पटवून देत नाही.
ती एक प्रोसेस असते.
कोण कुठल्या पानावर आहे हे देखील महत्वाचे.
सगळे काड्यापेटीतल्या काड्यांसारखे समान नसतातच मुळी.
म्हणून तर समाज बनलाय.
वय वाढणं, केस रूपेरी होणं यात समृद्धी आहे आणि ज्यांच्याकडे हा ठेवा नाही त्यांच्यासाठी त्यांच्या भुमिकेत शिरून विचार करणं हे being Relevant आहे.
#crossculture #sulawrites #marathi #leadershipdevelopment #lifeprocess
( photo credit 💃Me. रिओ दि जनेरो शहरातील आमच्या घराच्या बाल्कनीतून दिसणारा सूर्योदय
No comments:
Post a Comment