crossculture साधेपणातलं सौंदर्य 🇯🇵😚🤗
चीन, जपान मधले टी सेरेमनी बद्दल कधीतरी लिहिन. अगदी कप कसा पकडायचा यालाही नियम आहे.
नेटफ्लिक्सवर 'मिडनाईट डिनरचे' दोन सिझन आहेत. कुणाला जपानी खाद्यसंस्कृतीची जुजबी ओळख हवी असेल तर .
इझाकाया म्हणजे एक लहानशी Eatery . काम करणारे पटकन लंच किंवा डिनरसाठी इथे येतात.
मिडनाईट डिनर मध्ये असणा-या इझाकायाचं वैशिष्ट्य म्हणजे हे रात्री चालू होतं आणि पहाटे बंद होतं. पहिल्या सिझनमध्ये एकच डिश सर्वांना दिली जात असे. इझाकायात येणारे ग्राहक आणि त्यांच्या कथा एकेका भागात होत्या. नंतरच्या सिझनमध्ये पात्रांच्या आयुष्याचा भाग असणा-या रेसिपी यायला लागल्यात. या रेसिपी सुद्धा कथानकाचा सटल भाग आहेत. इझाकायाचा मालक आणि शेफ त्याच्याकडे जे आहे त्या पदार्थांचा वापर करून डिश बनवतो.
इतर देशातील रेस्टॉरंटमध्ये जशा टेबल खुर्च्या असतात तशा टेबल खुर्च्या इझाकायात नसतात. पारंपारिक रचना असते. शेफ तुमच्यासमोर पदार्थ बनवून देतात.
जपानी करी चा अपवाद सोडला तर सूप , नूडल्स, भाताचे प्रकार हा बेसिक प्रकार इथे आहे.
सुशी, साशेमी आहे.
चीन, जपान, कोरिया, तैवान इथे करी दाट नसते. थायलंड च्या खाद्यसंस्कृतीत एक मेळ आहे .
CJK ( china Japan Korea) मधले सूप्स आणि सार्क देशातील खाद्यसंस्कृतीची काही वैशिष्ट्ये.
त्याबद्दल नंतर केव्हातरी कारण ही पोस्ट " CJK " खाद्यसंस्कृतीची नाही.
जपान फ्रेंच या दोघांकडे असलेला कलासक्त पणा त्यांच्या पाॅटरीत दिसतो. बायकांच्या राहणीमानात दिसतो.
एक संकल्पना आहे कॅप्सुल वाॅर्डरोब म्हणून.
फ्रेंच आणि जपानी बायकांना ती नेमकी माहित असते.
कपाट उघडलं आणि कपडे बदाबदा खाली कोसळले तरीही आता काय घालायचं हा प्रश्न अशी धर्मसंकटं दिसत नाहित.
होळीला सगळे कपडे नवे आणि दिवाळीला माझे सगळे कपडे जुने आहेत असं वाटत नाही .
तुम्ही जर कधी फ्रेंच किंवा जपानी घरी गेलात कॅफेझिनो किंवा लंच डिनरसाठी तर तुम्हाला हमखास एक अगत्यशीलपणा जाणवेल.
खुपसं प्रेम, आत्मियता, सुबक मांडणी करून ठेवलेलं टेबल.
तेवढीच सुंदर क्राॅकरी.
बरं यासाठी बॅंक खातं दोन्ही दारानं वाहत चाललंलय असं नसतं.
पदार्थांच्या द्रव किंवा घनतेनुसार पोर्सेलोनची भांडी.
घरात भगभगीत ट्युबलाईट नाही तर एक मंद तरीही आनंदी प्रकाश.
एकदम हाॅस्पिटलसारखी प्रकाश योजना फक्त स्वयंपाकघरात फारफारतर.
हे चुक किंवा बरोबर यात आपण पडू या नकोत.
पण एक सांस्कृतिक बदल म्हणून पाहूयात.
तोक्यो/ टोकियो मधल्या रेस्टॉरंट मधे ही हे दिसून येतं.
इझाकाया पासून ते 7 मिशिलियन पर्यंत.
तर तिथल्या काही मिशिलियन स्टार रेस्टॉरंटमधे आम्ही जात असू तेव्हा मला समईचा सौम्यपणा दिसायचा.
गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्वातील. राजा रवीवर्माच्या तैलचित्रातील सरस्वती सारखा.
जपानी असोत की फ्रेंच इथल्या वरच्या वर्गातील लोकांकडे पाहिल्यावर subtle हा शब्द त्यांना पाहून तयार झालाय असं वाटतं.
Roppongi हा तिथला प्रतिष्ठित विभाग. तिथल्याच एका नॅशनल आर्ट सेण्टर मधे हे एक रेस्टॉरंट होतं. मिशिलियन रेस्टॉरंट.
फोटोत जी कप बशी दिसतेय ती त्याच रेस्टॉरंटमधली.
Brasserie paul Bocuse le musee हे नाव असणारं हे फ्रेंच रेस्टॉरंट.
सकाळी चहा घेताना हा कप काढला म्हणून हे लिहावसं वाटलं.
आम्ही Ambience साठी जात नाही असं म्हणा-यांचा मनापासून आदर . त्यांच्यासाठी ही पोस्ट नाही.
#sulawrites #marathi #japan #मराठी #netflix
No comments:
Post a Comment