मागच्या महिन्यात काही कामानिमित्त माझं देहूला जाणं झालं होतं.
बळ मिळवलं त्या घराच्या खांबांना हात लावायचा होता. हजारो मोटिव्हेशन व्हिडिओतून जे होत नाही ते त्या वास्तुतल्या खांबांमुळे होतं हा माझा आजवरचा अनुभव आहे.
जड झालेल्या मनाचा भार हलका करून देणा-या तुकाराम महाराजांच्या घरातून बाहेर पडले. तर शेजारी त्यांच्या इतर पुर्वाजांची घरं होती. माझ्यासोबत त्यांच्याच आताच्या पिढितील तरूण आर्किटेक्ट होता. माझ्या लेकाच्या वयाचा. त्याने त्याच्या नजरेनं देहू फिरवून आणलं.
आनंदानं, समाधानानं रडावं की रडू नये या द्विधा मनस्थितीत असताना या प्रवासी बायका दिसल्यात. त्यांना सवयीने नमस्कार केला तर त्या म्हणाल्या, ताई या जेवायला?
जमीनीवर बसायला जमेल का असं कानावर पडण्याच्या आधीच त्यांच्या शेजारी बसले.
अहमदनगरहून पायी आलेल्या या वारकरी स्त्रिया स्वतःची भाजी भाकर चटणी घेऊन आल्या होत्या. वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, खुरसणीची चटणी, कांदा. तिखटाची सवय नव्हती पण त्या माऊलीचा मान राखायचा होता. पहिला घास घेणार तर त्यातील एकीनं मला हातावर द्राक्षं दिलीत. तुम्हाला तिखटाची सवय नसेल ना.
भारत जेव्हा असा खेडोपाडी अनोळखी लोकांच्या वागण्या बोलण्यातून दिसतो तेव्हा जाणवतं मी नावापुरती #Crossculture Metacognition शिकणारी शिकवणारी.
या साध्या लोकांकडे Acceptance जास्त असतो. तुम्ही वेगळे म्हणून तुम्हाला #microinvalidations ला काॅर्नर करत नाहीत.
देहू मधून मी जे शोधत होते तो आधार मला त्या भाकर तुकड्यात मिळाला होता.
#sulawrites #marathi
No comments:
Post a Comment