Working Woman and Biases

#workingwomen #biases
 संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिरपणे एखादी जबाबदार व्यक्ती बोलते तेव्हा जाणवतं बायकांचं घराबाहेर पडणं इतकं का झेपत नसावं समाजमनाला? बरं ज्या बायका स्वयंपाकघरात शहीद होणं बाकी आहे त्यांचं काय? शाम को खाने में क्या है? हा प्रश्न फेस करून पहाच एखादा महिना! 
ज्या बायका 'घरीच असतात 'त्यांना होणारा सामाजिक कौटुंबिक जाच, टोमणे, कुचेष्टा याबद्दल बोलायलाच नको. 
घरगुती हिंसाचाराबद्दल बोलू तेवढं कमीच. हे प्रमाण एनआरआय बायकांपासून ते डोमेस्टिक इंजिनियर अशा सर्व स्तरात पाहिलंय. 

समाज बाहेरही जाऊ देत नाही आणि घरी सुखानं जगू देत नाही. अशा स्त्रियांना ही कविता सादर आहे. 
ही कविता त्या सर्व बायकांना समर्पित ज्यांनी कांदा कापण्यात प्राविण्य मिळवलंय. 

तीन वर्षांपुर्वी नवरात्रीत लिहिलेली कविता आहे. हिन्दीत आहे. माझ्या कविता हिन्दीत असतात शक्यतो इथे पोस्ट करत नाही. 

नही पहननी मुझे लाल साडी. 

स्मार्ट फोनपर झूम करकर के 
दुसरों की औरतों के साडीओंमे लिपटे 
लाल रंग में डुबे 
पतीने आवाज देकर
तिखे तारस्वर में कहा 

सुनो, आज का रंग लाल है न? 

पैरोमे आल्ता लगानेवाली पत्नीने 
( आल्ता लगाके कठपुतली के जैसे इशारो पे नाचनेवाली पत्नी) 
चुनरी की बात अनसुनी कर के 
प्याज को और महीन काटा 
चार बार बनाकर भी 
ठंडी पडी सुबह की चायको पिते हुए 
कुकर की सीटी का 
बेसब्री से इंतजार करती हुई 
रसोईघर में चिरस्थापित
 गुलाल की देवी ने 
लाल चुनरी ओढने से मना जो किया 

क्यों पहनू मा की चुनरी? 

शेर का सहारा 
शेर की सवारी तो सिर्फ पुराणकथाओ में होती है 
नही पहननी मुझे लाल साडी 
डुबते साम्यवाद की डुबती कहानी 

रंग उडे मेहन्दीके साथ
 ये लाल रंग 
कब का छूट गया है मुझसे 
खुदके अन्यायपर 
तो कभी बोल नही पाती 
गृहस्थी के नाटक की ये गुंगी नायिका 
कभी लाल संविधान को पढ पायेगी? 

क्यों जिद मानू इनकी? 

लाल साडीमे तूम जचती हो खूब! 

तुम्हारी बिवी हू 
भला अंदर बाहरसे एक रंगमे कैसे रंगू मै? 

सुलक्षणा व-हाडकर. 
रिओ. 

 #notsored #marathi #हिन्दीकविता #Reposting #sulawrites 

Açaí असाई

असाई या wonder fruit wonder food बद्दल बोलले नाहीतर मी ब्राझिलियन म्हटली जाणार नाही. 

असाई हे एक पाम फ्रुट आहे. 

उन तापलं की समुद्र किनारी बसून नारळ पाणी ( तेही फ्रिजर इतकं थंडगार) आणि असाई घ्यायची. 
बियर इतकंच हे पेय प्रिय आहे इथे. 
कधीकधी डिनरच्या ऐवजी मी फक्त 450 ग्रॅम असाई खाते. 
यात हवे तेवढे उष्मांक तर मिळतातच पण सोबतीला अनेक फायदे आहेत. 
या फळावर संशोधन चालू आहे.  
दक्षिण अमेरिकेतील महत्वाचं फळ आणि पेय आहे हे. 

दर दिवसाआड आम्ही असाई खातोच. 
या फळाची टेस्ट लगेच विकसित होत नाही कारण त्याला स्वतःची अशी चव नाही. 
सोबरेमेसा अर्थात ब्राझिलियन गोडाचे पदार्थ .
ब्राझिल म्हटलं कि फुटबाॅल , सांबा , बिकिनी घातलेल्या स्त्रिया , बियर घेवून नाचणारे लोक , भव्य दिव्य कार्निवल आणि कडू कॉफी आठवते.
गेले आठ वर्ष मी ब्राझिल मध्ये राहतेय मला जे ब्राझिल रोजच्या आयुष्यात भेटतेय ते या पलीकडचे आहे .
आचार विचार राहणीमान जेवण खाण सगळ्यात स्वतःची अशी परंपरा आणि ज्या ज्या राज्यकर्त्यांनी इथे येवून राज्य केले त्यांच्या स्वयंपाकाची चव , त्यांचे जिन्नस , पदार्थ घेवून दुधात साखर मिसळावी तसं सगळ्यांनी प्रभावित होऊनही स्वतःची अशी वेगवेगळी पक्वान्नं ठेवणारं ब्राझिल मला दिसलं.
ब्राझिलच्या खाद्य संस्कृतीचा विचार केला तर त्यावर प्रबंध होवू शकतो. कारण पोर्तुगीज ,जपानी , आफ्रिकन , इटालियन , पोलिश , स्पानिश ,जर्मन, स्विस ,लेबनिझ अश्या प्रभावांमुळे त्यांच्या खाद्यपदार्थांची इथे रेलचेल होती . जे इथे पिकत नव्हते ते उस मळ्यात काम करणाऱ्या परदेशी मजुरांनी सोबत आणले. मजूर , कामगार म्हणून आलेले परदेशी इथे राहताना आपापल्या देशातील पदार्थांनी चव इथे घेण्याचा प्रयत्न करीत होते. जोडीला त्यांच्या पदार्थांचे गठबंधन होतेच . वसाहतकारानी आपले पदार्थ आणलेत.
मुळच्या ब्राज़िलिअन असलेल्या असाई , केळे, नारळ ,आंबा , पेअर , पीच , भोपळा , रताळे , अंजीर ,पपई ,माराकुजा , काजू , ग्वाराना , पेरू , अननस , प्लम , संत्रे , मोसंबी , उसाचा रस , गुळ , अवाकादो ह्या सगळ्याचा वापर इथल्या गोडाच्या पदार्थात होत होता जोडीला परकीय वसाहतींमुळे दुधाच्या पदार्थांचा वापर होत गेला . 
लिंबाचा रस , शेंगदाणे , मक्याचे दाणे , पीठ , साबुदाणा , इथे मिळत असलेले कंद सगळे काही गोडाच्या पदार्थात एकरूप झाले . दालचिनी चा वापर हि मोठ्या प्रमाणात झाला . जायफळ वापरले गेले .
फळांचा वापर करून बनविलेले केक तर ब्राज़िलिअन घरात दर आठवड्याला बनतात . म्हणजे आपण जितक्या सहजपणे शिकरण बनवू तेवढ्या सहजपणे केक बनविले जातात .

गाजराचा केक , भोपळ्याचा केक , केळ्याचा ,मक्याच्या पिठाचा , आंब्याचा सोयाबीन च्या पिठाचा , माराकुजाचा , लोण्याचा , बटरचा , पपयीचा , ताज्या किसलेल्या नारळाचा , संत्र्याचा , कोको चा . इथे उपलब्ध असेलल्या यच्चयावत फळांचा केक बनविला जातो .
इतकेच काय तर इथे पिझ्झा सुद्धा गोड असतो. म्हणजे केळ्याचा पिझ्झा , चोकलेट चा पिझ्झा , आंब्याचा पिझ्झा आणि वरून दालचिनी किव्हा जायफळ .
इथे असे म्हटले जाते कि सोबरेमेसा खाताना जितका बिझनेस केला जातो तितका बिझनेस प्रत्यक्ष कामाच्या तासात केला जात नाही. किंवा त्याबद्दल आवडीने बोलले जात नाही. इतके ब्राज़िलिअन माणसाला गोड खाणं आवडतं .त्यामुळे गोड खाता खाता तो त्याच्यासाठीच्या रटाळ विषयावरही बोलतो.


 #crossculture #acai #sulawrites #marathi

Move on with Several Falldowns

What Does Life look like when you don't clear your UPSC?
No regret. You move on with Plan B in your career.
I did .

 
It's been Twenty Five years in My Second Career which became my Passion.
After 25 years again I changed my 3 Rd option.
Nothing to regret.
Everything happens for a reason.
This Video is about Brazilian Iconic Poet Carlos Drummond de Andrade. His statue and his Worldfamous Poem.

IAS ,IPS न झाल्याचं दुःख होतं पण ते काळाबरोबर केव्हाच कमी झालं. पंचवीस वर्षे पत्रकारितेत काढलीत आणि आता क्राॅस कल्चर  मॅनेजमेंट आणि सांस्कृतिक बुद्धिमत्ता Cultural Intelligence या क्षेत्रात काम करतेय.

प्रचंड मानसिक समाधान आहे. घरात,नात्यात ,मित्र मंडळीत इतर सनदी अधिकारी आहेत त्यांचं फार कौतुक आहे. पण मला तसं होता आलं नाही याची खंत नाही कारण उद्या मी झाडू मारण्याचं काम केलं तरी ते Cut Above the Rest असणार आहे याची खात्री आहे.


Father of Brazilian poetry

आपल्या कामावर श्रद्धा असणं महत्वाचं. ते काम चोखपणे करता येणं महत्वाचं.
#career #sulawrites #crossculture #marathi #gratitude

False Cognets

Cognets/ False Cognets from Portuguese and Indian Regional Languages. 
Malyalam, Hindi and Marathi words correlation between Portuguese Loanwords, Cognets and false cognets. 

साधारण पंचवीस शब्दांची ओळख करून घेऊयात जे भारतीय आहेत आणि पोर्तुगीज भाषेशी त्यांचं सख्य आहे. 

#crossculture #sulawrites #marathi #linguisticempathy 

War and Business

#crossculture #storytime Wartime Concentration Scheme and Restrictions on a Pottery industry.
British utility ceramics in 1940s. 


In 1941-42 the ceramics industry was brought under Government control. Under the Wartime Concentration Scheme potteries were rated nucleus, concentrated or closed down. The higher end manufacturers went on as before but only to produce for export. Starting in 1943, the ‘concentrated’ potteries were given a list of approved Utility shapes to be produced in white or natural clay colour only. No decoration or colour was permitted. It is unclear where the designs came from but the cups for instance are very similar to pre-war hotel wares.

महायुद्धाच्या काळात पाॅटरी उद्योगावर बरीच बंधनं आली होती. इंग्लंडच्या सिरॅमिक भांड्यांची नजाकत, सौंदर्य जगजाहिर आहे. पण महायुद्धाच्या काळात या भांड्यांच्या कलाकुसरीवर, आकारावर आणि रंगसंगतीवर मर्यादा घातली गेली. 
अत्यंत बेसिक डिझाईन बनवल्या गेल्या कारण त्यात मनुष्यबळ वाया घालवून उपयोग नव्हतं. युद्ध भुमीवर माणसं हवी होती लढण्यासाठी. 
या पाॅटरीवर लिहिण्यात आलं.ती कोणत्या बॅचची आहे ते. A,B,C मार्क टाकण्यात आलेत. 

Wartime Concentration scheme खाली नियम घातले गेले. परकिय चलन मिळावं म्हणून उत्पादन बंद केलं नाही पण कमालीचा साधेपणा घेऊन बेसिक डिझाईन्स केलेत. 
कमेन्टमध्ये काही लिंक्स देतेय अधिक वाचनासाठी. 
व्हिडिओ मध्ये त्याच महायुद्धाच्या काळातील Baratts of Staffordshire Regency आणि B श्रेणीतील कपबशा आहेत. 
या माझ्याकडे कशा आल्यात तर आमचे खा पणजोबा रावसाहेब होते. ब्रिटिश सरकारकडून त्यांना तो मान मिळाला होता. त्यांचं लंडनला जाणं होत असे. इतकंच नाही तर पंचम भुपती यांच्या हस्ते आमच्या नाशिक येथील सॅनिटोरिअमचे उद्घाटन देखील करण्यात आलं होतं. 
मलबार हिलला राहणा-या  उमराव कुटुंबात काट्या चमच्याने जेवण्याची पद्धत होतीच पण ब्रिटिशांप्रमाणेच हाय टी घेतला जात होता. 
माझ्या आताच्या भारत भेटीत आईकडे ठेवलेलं माझं सामान आमच्या पुण्याच्या घरी शिफ्ट करतेय तेव्हा पुर्वजांच्या एकेक विस्मृतीत गेलेल्या ठेव्यांचा शोध लागतोय. 
आपण मोहंजोदरो आणि हडाप्पा इथल्या भांड्यावरून त्या अवशेषावरून संस्कृती समजून घेतो. 
महायुद्धाच्या काळातील पाॅटरी उद्योगाबद्दल वाचताना मला युद्धकालीन  सरकारी धोरणांचा उद्योगधंद्यावर झालेल्या परिणामांबद्दल समजून घेता आलं. 

The Government scheme to control and manage industrial production and distribution of essential products is often talked about as if it was solely concerned with furniture and its rationing to those in need. In practice the control of manufacturing was far more extensive, directing all kinds of companies to adapt their production to make military equipment and supplies, redistributing production to minimise the impact of the war on particular industries and managing materials consumption to avoid waste or shortages.

#sulawrites #marathi #warandbusiness

Transaction Analysis टोमण्यांचं जग

#Transcationanalysis 
 Taunting is a textbook tactic for bullies. It cannot be disguised as playful behavior or a litmus test to examine someone’s sense of humor. It is damaging to psychological wellbeing and cannot be folded under ‘light teasing’ – it is a cruel tactic, and its only purpose is to harm someone else.

Taunting is a choice to subject someone to emotional and mental violence out of contempt and disrespect. It is demeaning and it is a one-sided action. There is no guarantee that one will be able to defend themselves against people who are taunting them. Taunting is a display of power to grant oneself a superior position in whatever space that they are in. It is also a tactic to control someone’s behavior by wearing them out.

Some examples of taunting are:
making disparaging comments about someone, especially their appearance and work.
jeering at someone to the point of provoking them into a volatile action. E.g. – a sudden action of physical violence.
demotivating someone to the point of affecting their willpower.
rubbing your good fortune in someone else’s face – someone not as fortunate as you are.
mocking someone by doing a crude imitation of them.
grouping up with people to make fun of and alienate someone else.
 टोमणे मारण्याचे वीस प्रकार.व्यवस्थापन शिकताना Organizational Leadership Skills मध्ये  एक विषय होता.
टोमणे मारणा-या लोकांना कसं Assertively सामोरं जायचं ते  .
#lifeskills #gamespeopleplay
हा एक संगीतखुर्चीचा खेळ असतो.

जिथे आपल्या बरोबरच्या समूहातील, गटातील, आजुबाजूच्या दुस-या  आणि तिस-या सोशल वर्तुळात जेव्हा लोक जलस होतात तेव्हा तुम्हाला victim करतात नाहीतर स्वतः victim mode मध्ये जातात.  कधी स्वतः Rescuer mode मध्ये जातात त्याआधी तुम्हाला काॅर्नर करायला विसरत नाही. 
एखाद्या कडे दहा बाय दहाची खोली असेल तर ती खोली कशी घेतली यावर महाकाव्ये लिहितील.  गाथा सांगतील आणि तुमच्या तितक्यात मेहनतीने घेतलेल्या घराला पाहून ' हाऊ लक्की म्हणत उसासे सोडतील.

एखाद्या सुखवस्तू घरातील व्यक्तीने एम डी, पीएचडी किंवा एमबीए केलं तर त्यांना काय कमी म्हणतील.
यशाची तुलना करताना मेहनत, कष्ट याकडे दुर्लक्ष करून संधी आणि व्यासपीठ यावर फोकस ठेवून मानसिक खच्चीकरण आणि सामाजिक पातळीवर तुमच्या कर्तृत्वाला Dilute करण्याचा प्रयत्न या टोमण्यांमध्ये असतो.
एखादे व्यक्तीचे उच्चार खणखणीत असतील तर आम्ही काय माधुकरी मागतो का म्हणायचं?

एखादी महिला उजळ कांतीची असेल तर तिच्यासमोर सावळा रंगच कसा सौंदर्याचं प्रतिक असं म्हणायचं.
निळा भगवा  हिरवा रंग पाहिला की विशिष्ट समुहाच्या लोकांना टारगेट करून साॅफ्ट verbal टोमणे मारायचेत.
अरे, गंमत केली रे म्हणून सारवा सारव करायची.
कोपरखळ्या, टोले लगावणं, हलकेच घे म्हणणं, गंमत केली रे, Chill yaar, Don't be over sensitive किंवा अशा प्रकारे कुणी जर सुरूवात करत असेल संवादाची तर ती टोमण्यांच्या प्रवेशाची नांदी असते. तिथे  सभ्यपणे तुम्हाला खाली दाखवलं जातं. 
वेळीच समयसुचकतेने टोमण्यांच्या टोळधाडीला परतवून लावायला हवं हे नक्की! 



#sulawrites #crossculture #marathi

Japanese art of compassion Omoiyari

Omoiyari - Japanese Art of Compassion. 
Omoiyari - Altruistic Feeling to others , Japanese Art of Compassion, Thoughtful Consideration, Emathy and Caring for others .
#Empathy .

Have you heard about it before ? 
बुरा जो देखन मैं चला, बुरा न निकलो कोय!

करूणेचं असंही एक रूप. सहसंवेदना अशीही असू शकते. इतरांबरोबर घडलेल्या दुःखद प्रसंगांची आपल्याला जाणीव नसते कारण आपण तिथे परके असतो परंतु अशा दुःखात आपण त्यांच्याशी कसं वागायला हवं ही शिकवण जपानी समाज शिकवतो. मग मॅनेजमेंटच्या संकल्पना सुद्धा हे माणुसकीचं तत्वं पाळतात. 
बुद्धाला जे दिसलं, समजलं, उमगलं ते आपल्याला समजेलच असं नाही पण आपल्या भावनिक क्षमता आणि मर्यादेसह ते गुण, संयम आणि समजून घेण्याची, कान होऊन खांदा देण्याची वृत्ती  आऊटडेटेट नाही. 


Let's see 5 Key Factors from Japanese Psychology. 
5 Key Factors .
a) Tatemae and Honne 
b) Trust within Groups 
c) Arugama 
d) Awareness 'Morita Therapy 
e) Reflecting to our own stories and relating them with Nature.

It is not closer to Rational Emotive theory but has it's own Cultural factors to define .

Cutting Edge Sophisticated Japanese socitey is same time Traditional and Highly Cultural. 

How these factors are Reflected in their Social Psychology and Behavior? 

This Video is in Marathi मराठी. 

I am trying to explain Worldwide Social Psychology in Marathi . This one is from Japan Series. 

 #socialpsychology  #leadership #sulawrites  #CQ #crossculture #Marathi

Petrichor

  How you look at the Rain is also part of a  #Culturalinterpretation  Being an Indian Living In Rio,  lived in  Japan and China . Here are  some #wordmagic about Rain in Japan.


पन्नास प्रकारे पडणारा जपानी पाऊस.

भाषेचे  सौंदर्य ती भाषा शिकल्याशिवाय नाही कळत .

आता जपानी भाषेचेच पहा . नुसता पाऊस पडतोय हे  जपानी माणूस ते पन्नास पद्धतीने सांगू शकतात . हो त्यासाठी त्यांच्या कडे तसे शब्द आहेत .

जपानी भाषेत पावसाचे वर्णन पन्नास शब्दात करता येते .  पाऊस कसा , केव्हा कित्ती पडतो त्यावर त्याला नाव दिलेले आहे . अशी पन्नास नावे आहेत .  पाऊस , पावसाची वेळ , पावसाची तीव्रता , त्याचा वेग , पावसाचा गारवा थंडावा ह्यावर तो कोणत्या प्रकारचा पाऊस आहे हे वर्णिले  जाते .

थोडे सोप्पे करून सांगते .

' #雨  ' या  चित्राचा  अर्थ आहे पाऊस . छत्रीचा आकार आणि त्यात पावसाचे थेंब . उच्चार आहे 'आमे '. आता मी जर   '大雨   ओआमे 'म्हटले तर तो होतो जोरजोरात पडणारा पाऊस . 'शिन्तोत्सुकामे 'म्हटले तर तो होतो तीव्रतेने पडणारा पाऊस . 'साय्यू 'म्हटले कि होते भुरभुरणारा , 'कोनुकामे 'म्हटले तर मापात पडणारा .  '風雨 फू  'म्हटले तर वारा आणि पाणी, 'आमेनुचीयुकी' म्हटले तर पावूस मग बर्फ ,'युकी माजिरि 'म्हटले कि आधी बर्फ आणि मग पाऊस .

'雨露उरो 'म्हटले कि पाऊस आणि मग दव
 'हारेनोची आमे 'म्हटले कि आधी सर्व निरभ्र आकाश आणि मग  येणारा पाऊस .

'涼雨 रयोयू 'म्हणजे थंड गार पाऊस आणि  
'冷雨 रेयू 'म्हटले कि कुडकुडत गारवा आणणारा  पाऊस ,

' 五月雨 सामिदारे ' म्हटले उन्हाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पावूस , ' 秋雨आकी सामे ' म्हटले कि autumn मधला पाऊस ,

'युदाची ' म्हणजे संध्याकाळचा अचानक आलेला पाऊस , 'नागामे 'म्हणजे बराच वेळ  पडणारा ,

'आमागिरी 'म्हणजे पावसानंतरची तऱ्हा ,'十雨ज्युउ' म्हणजे दहा दिवसात एकदा पडलेला प्रसन्न करणारा पाऊस ,'夜雨 याउ 'म्हणजे रात्री पडणारा पाऊस.
आहे न गम्मत ! जपान सोडून कितीतरी दिवस झालेत पण  जपानी भाषेचे वेड  काही कमी होत नाही.
( मला फार उत्तम जपानी भाषा येत नाही आता.  सराव कमी पडलाय. माझ्या कडून चुकीचे उच्चार लिहिले असल्यास ते दुरूस्त करावेत )

petrichor मृदगंध 
/ˈpɛtrʌɪkɔː/
noun
a pleasant smell that frequently accompanies the first rain after a long period of warm, dry weather.
Gráfica credits American Chemical society. 
Video from our Residence 🏡

#Marathi #firstrain #vacationvibes 

Wine Bar in a Mall

crossculture #wineculture 
Wine in a Grocery shop had created lots of Protest and Negative publicity in Maharashtra state.

 When State Govt tried to implement Wines in a Local Grocery Shops. 
Although I came from Wine Capital Nashik City but We had a Serious Discussions at home when I supported the Idea. 
This is a Small tour of a Wine stall and how one can have small sip of it in the afternoon while shopping 🛍 
आज दुपारी काही कामानिमित्त माॅलमध्ये गेले होते. दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठ्या माॅलमध्ये हे वाईनचं दुकान दिसलं. या दुकानात तब्बल साठ देशातील वाईन उपलब्ध होत्या आणि वैशिष्ट्य म्हणजे पाच रूपये देऊन तुम्ही तिथे एखादा ग्लास सहज घेऊ शकता जसं आपण स्टारबक्समध्ये जातो आणि आपल्या आवडीची काॅफी घेतो. वाईन कल्चर बद्दल इथे निकोप दृष्टिकोन आहे जो आपल्या संस्कृतीत धक्कादायक असू शकतो. 
तुमच्यासाठी हा एक लहानसा व्हिडीओ जाता जाता. 
देश बदलला खंड बदलला की संस्कृती बदलते. आपण फक्त निरिक्षण करायचं. जजमेन्टल न होता पहायचं. 
#sulawrites #marathi 
Degusto Club pls Convey my Thank you to Adriana for giving me permission and explaining about Wine Cafe 🍷 

Pokayoke-Quality Management

पोका योके आणि जपानी व्यवस्थापन! #qualitymanagement  

त्याचा स्क्रू ढिला झालाय! 

( पण हा स्क्रू ढिला होऊ नये म्हणून काय करता येईल? समजा झालाच तर कशा पद्धतीने पुन्हा फिट करता येईल? ती जपानी  पद्धत म्हणजे पोका योके ) 
आता माझी सटकली 😎
( हे सटकनं आहे ते Man Made आहे Environmental आहे की अन्य कोणत्या कारणाने? हे तर्काने,  रॅशनली पाहून डोक्याला ताब्यात ठेवता येईल. पण मग त्यासाठी Error Proofing तंत्रज्ञान वापरायला हवं.  जो नियम मशीनसाठी तोच माणसासाठी ) 
Man is known by company he keeps 📡

( सोशल मिडियावर हजारो फाॅलोअर्स असणारी एक जण जवळचा मित्र नाही म्हणून कुढत असताना जाणवलं की तिला पोका योकेची गरज आहे.  आयुष्यात गुणात्मक दर्जा महत्वाचा संख्यात्मक नाही)

Quality Management ची आवश्यकता फक्त मशीन आणि उत्पादनासाठीच असते असं नाही तर आयुष्य जगण्यासाठीही तितकीच महत्वाची आहे. 

जपानी उत्पादनांमध्ये असणारा दर्जा,  परफेक्शनचा हव्यास आणि कामावर असलेली श्रद्धा पाहिल्यावर 'पोका योके 'ही पद्धत तुम्हाला पटू शकते.  

1960 सालापासून पोका योकेची सुरूवात झाली यात कामाच्या ठिकाणी  मनुष्याकडून होणा-या चुका आणि यंत्राकडून होणा-या चुकांचा अभ्यास करून त्या कशा टाळायला हव्यात यावर उपाय योजना करण्यात आल्यात. 

मला प्रत्यक्ष आयुष्यातही पोका योके पद्धत महत्वाची वाटते. 
चुकूनही चुक होता कामा नये. 
गलती से भी ना गलती हो जाये. 
अर्थात काम चोख असावं व्हावं. 

एक सोपं उदाहरण सांगते.  सर्वांशी आपुलकीने वागावं पण जवळच्या वर्तुळात फक्त चार पाच जण असावेत . याच चार पाच जणांच्या व्यक्तिमत्वाची सरासरी म्हणजे आपलं व्यक्तिमत्व असतं आणि बनतं.  

स्वतः हून चुकीचे पार्ट निवडून आपलं व्यक्तिमत्व loaded with Human Errors असता कामा नये. 
तर काय आहे  हे पोका योके तंत्रज्ञान. 

समजा आपली आयुष्य जगण्याची पद्धत एका रूटीन मध्ये बंदिस्त असेल तर काही तत्वं त्यात असतात.  ही तत्वं जर मशीनचे सुटे भाग आहेत असं समजलो आणि यातून कोणतं सार आपल्याला मिळेल,  मिळत आहे, मिळू शकतं हे आपल्याला पहायचंय. जगण्याचा  दर्जा महत्वाचा कारण त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडतं.  आपण कोणती तत्वं निवडतो आपलं मशीन चालवण्यासाठी हे ही महत्वाचं उत्पादन दर्जासाठी.  मग तुमचं प्रोफेशन काहीही असो.  लेखक,  कवी,  गायक,  सरकारी नोकर, वकिल, डाॅक्टर, इंजिनिअर अथवा शेतकरी, हमाल, डबेवाला, भाजीवाला, गवंडी सुतार किंवा कोणताही व्यवसाय.  बेसिक पार्ट निवडायला चुकायचं नाही.  क्वाॅलिटी मॅनेजमेंटमधलं तत्वं.  चुका होता कामा नये, कॅज्युअल्टी होऊ नये म्हणून मोडस ऑपरेण्डी ठेवायची.  जास्त गुंता ठेवायचा नाही.  पोका योके मला खुप अध्यात्मिक पद्धत वाटते.

 #crossculture #pokayoke  #sulawrites  #marathi #मराठी 

साहस पे लिखो, संख्या पे लिखो

#हिन्दीदिवस  हिन्दी राजभाषा की राष्ट्रभाषा या वादात का पडायचं? माझ्या साठी हिन्दी मातृभाषा आहे कारण आम्ही घरी मालवी हिन्दी बोलतो. मध्यप्रदेश सासर असल्याने घरातली संवादाची भाषा हिन्दी आहे. अंधेरी अप्पर जुहू सारख्या उपनगरात वाढल्याने, राहिल्याने हिन्दी भाषा कधी परकी वाटलीच नाही.
 कबीर ,अमीर खुस्रो, मैथिलीशरण गुप्त, माखनलाल चतुर्वेदी, सुर्यकान्त त्रिपाठी निराला ,शिवमंगल सिंह सुमन ,सर्वेश्वर दयाल सक्सेना, अदम गोंडवी, दुष्यंत कुमार यांच्या कविता वाचत आयुष्य गेलंय. 


पत्रकार म्हणून जरी मराठी भाषा निवडली तरी कविता फक्त हिन्दीतच लिहिल्या. त्यातल्या काहींना पुरस्कारही मिळालेत. 
हिन्दी दिवसच्या निमित्ताने माझी एक कविता. 

ऐ उंचे कद के इन्सानों 
तुम हम पें लिखो 
बौनों पे लिखो 
तुम्हे टांगनेवाले किलों के 
साहस पे लिखो संख्या पे लिखो 

गहरी चोटोंके साथ लिखो 
उनके भरनेके बाद लिखो 
आबाद लिखो बरबाद लिखो 
लिखो तो सही हम पढ लेंगे 

तुम चीन की उस दिवारोंका 
मिलोंके सफरका साज लिखो 

सुरज के रथपर जाते हुए 
अपने बारे मे आप लिखो 

Reposting my poem .

कोविदच्या सुरूवातीच्या काळात मुंबईतून विविध राज्यातले मजदूर पायी चालत त्यांच्या गावी गेले होते. 
त्या सगळ्यांना ही कविता समर्पित आहे. 

#hindidivas #hindi #हिन्दी #sulawrites

Cultural Nomunication

Cultural Nomunication हे माझ्या न्युजलेटरचं नाव आहे.  या शब्दाचा अर्थ सांगते. Nomunication म्हणजे Nomikai आणि Communication या दोन शब्दांमधून तयार झालेला हा शब्द आहे. ही जपानी सांस्कृतिक Term आहे.

 संध्याकाळी ऑफिस संपल्यावर तिथले नोकरदार सॅलरीमॅन एकत्र जेवणासाठी आणि ड्रिंक्ससाठी एकत्र बाहेर जातात. हा तिथल्या ऑफिस कल्चरचा एक भाग आहे. दिवसभर नियमांमध्ये बसून परफेक्शन पाळणारे जपानी नोमिकायच्या वेळेस सहजतेने,मोकळेपणाने संवाद साधतात.


  नोमिन्युकेशन म्हणजे ताणविरहित संध्याकाळी जनरल गप्पा मारणं यात ऑफिसशी संबंधितही काही चर्चा असतात. कल्चरल नोमिन्युकेशन या नावामागे माझा उद्देश हा होता की संध्याकाळी चहा, काॅफी, किंवा तुमचं आवडतं पेय घेऊन जेव्हा तुम्ही लिंक्डइन स्क्रोल कराल तेव्हा काहितरी साधं सोपं तरीही Value Addition असलेलं तुमच्या नजरेखालून जावं. जपान, चीन आणि ब्राझील बद्दल माझी निरिक्षणं असतात. पत्रकार तर आहेच मी पण जोडीला दोनदा एमबीए झालेय. त्यामुळे मॅनेजमेंटच्या अंगाने सांस्कृतिक बुद्धिमत्तेबद्दल इथे लेख लिहितेय. तुम्हाला माझं लिखाण आवडत असेल तर हे न्युजलेटर Subscribe करू शकता / हा ब्लॉग फॉलो करू शकता. 

Katsuobushi

Katsuobushi and #migrants’ life.
Katsuobushi are Dried fish which typically shaved and steeped in water to make #Dashi, The foundation stock to Japanese cuisine. It is Made by Multiple time Drying and fermenting #skipjacktuna fish. Skipjack Tuna is a Migratory Fish in Japan coastal Water. This Fish Filleted into three pieces. Then simmer to set the proteins before cooling down. with Traditional method with strict quality control Everything followed by. Cutting, Boiling, Deboning, Smoking. 
जपानच्या समुद्रात मायग्रेटेड होऊन हा मासा जेव्हा येतो तेव्हा त्याला पकडून त्यावर प्रचंड सोपस्कार करून त्याला ठोकळ्यासारखे बनवले जाते. यात काटे काढण्यापासून ते अनेकदा स्मोक दिला जातो.त्यातील ओलावा काढून, तासून सहा महिने दिव्यातून जातात. मला हे रूपक स्थलांतरित लोकांसाठी वापरावंसं वाटतं. Comfort zone च्या बाहेर दुस-या समुद्रात जाऊन राहणारी स्थलांतरित लोक्स. त्यांचा परदेशातील संघर्ष.
#culturetrip #sulawriteshttps://www.linkedin.com/pulse/katsuobushi-%E9%B0%B9%E7%AF%80-sula-%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%A3-


Oubaitori

#Oubaitori and #ikigai are Complimentary on the Intellectual level. #भलाउसकीसाडीमेरेसाडीसेसफेदक्यों 
Art of being yourself. Accepting without comparing with others. No comparison with them. What had it called in English? 
I don't know but, in the Japanese, it is called Oubaitori. 


Oubaitori ही जपानी संकल्पना तुम्हाला माहित आहे का? 
आपली तुलना आपण दुस-या कुणाशीही करायची नाही. जपानमध्ये वसंतात फुलं फुलतात तेव्हा चेरी, प्लम, ॲप्रिकाॅट आणि पीच चे बहार एकाचवेळी फुलतात. 
ते सर्व बहार स्वतःचं सौंदर्य घेऊन येतात. त्याची तुलना करायची नसते. 
या चार फुलांच्या अक्षरांना घेऊन हा शब्द तयार झालाय. 
तुम्हाला तुमच्या जगण्याचा मार्ग, ध्येय, इप्सित अथवा इकिगाय सापडली असेल तर Oubaitori सुद्धा समजू शकते .
कबीर म्हणतो तसं, बुरा जो देखन मैं चला, बुरा न निकलो कोई 🌻
  #japaneseculture #sulawrites #culture #goalschallenge #CQ #mondaythoughts

Being a Cultural Nomad

Crossculture is all about People and places and its Influence on us #BeingaNomad Being a Mumbaikar (Andheri west and Malabar hills) Has positive influence on Me. Small cities have its own charm, but Big city offers you much more beyond and above your Comfort zones.

Living In Big Cities Like Mumbai, New Delhi, Tokyo, Shanghai, Rio De Janeiro and Fairly acquainted with Hyderabad, Ahmedabad, Pune, Nashik, Beijing, Indore, Navi Mumbai, and Gurgaon had opened Socio Cultural doors for me.
Not counting my Touristic Experience here (fifteen plus countries ) 
What I learn so far from my Nomadic Life experience is this --

●Intercultural Sensitivity 
●Appreciation for Being Different 
●Adaptability - Highly Adoptable 
● Understand Differences and Similarities of 3 R and cherished them with ease.
○Rituals 
○Relationship 
○ Restrictions 
●Multilocal Identity 
●Acceptance of Different Cultures without being Judgmental or Opinionated 
●No Danger of Single Story 
● Adopt /cope / Adjust Easily 
●Discover Independence and Confidence out of their Confort Zone 
● Acknowledge the loss 
● Can Say Goodbye and Understand the Loss / Move On easily 
●polyglot ●Higher level of Empathy 
●Flexibility 
It's My dream to understand People and places beyond their cities and with their Cities Identity. 


#gratitude #byebye2021 #मेरेगांवमेरेदेस

Who Never lost are Unprepared

Who Never lost are Unprepared! 
ज्यांनी आयुष्यात बरंच काही गमावलेलं असतं ती माणसं अघटिताला सामोरं जायला तयार असतात. 
एमिली डिकिन्सन ही अमेरिकन कवयित्री हेच म्हणते. 

How many Bullets bearest?
Hast Thou the Royal scar?
Angels! Write "Promoted"
On this Soldier's brow!

एमिली डिकिन्सन पुन्हा नव्याने वाचायला घेतलीय. कोरोना काळात आजुबाजूला मृत्यू जांभळासारखे टपटप पडायला लागलेत. 

मरणोत्तर लोकप्रिय झालेली आणि तिच्या प्रतिभेचं मोल जगाला कळलेली ही कवयित्री. 
मृत्यू ला सखा मानते.  

For her Death is Supreme Touchstone in her most of the poems .

Color-Caste-Denomination-

These-are Time’s Affair

Death’s diviner Classifying
Does not know they are
As in sleep-All Hue forgotten-
Tenets-put behind-
Death’s large-Democratic fingers
Rub away the Brand-
People, whether they are white, black, or blonde are all subject to death:
If Circassian-He is careless-
If He put away
Chrysalis of Blonde-or Umber-
Equal Butterfly-

मृत्यू सर्वांना लोकशाही समजावतो असं ती म्हणते. 

“Not any higher stands the Grave”.

 All people, young and old, 
poor and rich will inevitably face death. 
Not any higher stands the Grave
For Heroes than for Men..

रविवारची सकाळ.  

काॅफी, ब्रेकफास्ट, कविता आणि पावसाळी हवा 🤗

 #crossculture #emilydickinson #sulawrites #marathi 

Komorebi

#komorebi कोमोरेबी is a Japanese word. it has similar Characteristic flavor as #Ikigai.
the space between the canopy and branches allows sunlight to gently filter through. In Japan, the dappled light this creates is called komorebi (pronounced koh-mo-reh-bee) and is made up of the kanji characters for tree (木), shine through (漏れ), and sun (日).


अशा उन्हात, सुर्यप्रकाशाच्या लपंडावात,झाडापानात लपलेल्या किरणांच्या झिरमिरित कवडश्यात जपानी लोकांना रपेट मारायला आवडते.





Not all or Not Many freelancer writers start their Day in woods with Coffee and First Rays of Sun .


#sulawrites #crossculture #marathi #gratitude
📸आमच्या सोसायटी शेजारचं  महानगरपालिकेचं कनालच्या किना-या शेजारचं जंगल. शहर- रिओ दि जनेरो, ब्राझील. 

Linguistic Empathy

#worldmothertongueday #Empathy #Unitedlydifferent Year 2008- Tokyo American Club,Japan.

हा प्रसंग घडला होता साधारण 15 वर्षांपूर्वी .स्थळ होतं जपान मधील टोकियो शहर .अमेरिकन क्लब. परदेशी नागरिकांच्या बायकांसाठी हा क्लब खूप काम 
करतो.
 आम्ही जपान मधील इंग्लिश भाषेबद्दल बोलू लागलो .नंतर विषय अमेरिकेतील भाषेकडे वळला . ह्या विषयावर बार्बरा खूप अधिकाराने बोलत होती . तिला अमेरिकेतील स्पॅनिश वापराचा खूप राग येत होता .ती म्हणत होती प्रत्येक ठिकाणी आम्ही स्पॅनिश फलक का वाचायचे ? प्रत्येक वेळेस जपानी, चीनी ,स्पॅनिश भाषांना का महत्व द्यायचे ?

 हेल्प लाईन ला एक साधा फोन करायचा असेल तर इंग्लिश पर्यंत पोहोचण्यासाठी तिला दहा भाषांना पार करून जावे लागते ,अमेरिकन सरकारच्या भाषाविषयक धोरणावर तिचा आक्षेप होता .इंग्लिश सोडून त्या इतर भाषांना दिलेलं महत्व तिला पटत नव्हते . तिला काळजी होती कि तिच्या पुढच्या पिढीला सक्तीने स्पॅनिश भाषा शिकावी लागेल . बार्बरा बोलत होती आणि तिच्या आवाजाला धार येत होती . ती पुढे म्हणाली आम्ही कर भरतो आणि त्यापैशाने सरकार भाषाविषयक भावना जपतं .

तिची मैत्रीण सुद्धा ह्याला विरोध दर्शवित होती . परंतु तिला त्यात गैर वाटत नव्हते .
आमच्या शेजारी स्वीडन ची एक जण होती .ती त्या विषयावर भावूक झाली . तिच्या देशात ती स्वीडिश , जर्मन ,इंग्लिश आणि फ्रेंच शिकलीय . तिला थोडीफार नॉर्वेजियन आणि फिनिश भाषा सुद्धा येते . कारण हे देश तिच्या देशाच्या जवळचे होते . म्हणून त्या भाषा ती शिकली .मात्र तिच्या मुलांना तिची स्वीडिश भाषा येत नाही . म्हणजे ते मातृभाषेत सरावलेले नव्हते . त्यांना इंग्लिश स्वतःची भाषा वाटते . तिने हे सत्य स्वीकारले आहे पण ती या बाबतीत दुःखी आहे .
टोकियोच्या अमेरिकन क्लब मध्ये आम्ही ४ देशांच्या स्त्रिया स्वतःच्या मातृभाषेबद्दल बोलत होतो .

आता माझी वेळ आली . कसा कोण जाणे माझ्यात एकदम आत्मविश्वास संचारला .मी आत्मकथा सांगायला सुरुवात केली. "मी मुंबईकर , मराठी माझी मातृभाषा .हिंदी आमची राष्ट्र भाषा ?! ( याबद्दल वाद आहेत. मला स्वतःला दक्षिण भारतीय भाषा आवडतात) . "
त्यावर एक जण म्हणाली कित्ती बरे न .हिंदी बोलले कि सर्व भारतीयांशी तुम्ही जोडला जात असाल ? मी म्हटले नाही . इथे मी अनेक भारतीयांना भेटले ज्यांना हिंदी येत नाही आणि ते हे झुरळ झटकल्या सारखे करतात. म्हणजे बॉलीवूड सिनेमे पहिले जातात आवडीने पण हिंदीला तुच्छ समजले जाते .
  तिथे मला त्या सर्वांना सांगता हि येत नव्हते कि आम्ही सर्व प्रथम स्थानिक असतो आणि मग जमलं तर पूर्ण भारतीय . 
 " युनायटेडली डिफरन्ट ".
भाषा हि आमच्यासाठी प्रश्न नसून अस्मिता आहे .
 तीव्र अस्मिता ! 
टोकियो फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा मला हे जाणवलं होतं .
 "चक दे " तिथे दाखवला गेला तर जपानी माणसांना हे कळतच नव्हते कि वेगळ्या स्टेट मधून आल्याने काय बिघडतं? 
जेवणाच्या टेबलवर मी त्या सर्वांना म्हटले भाषा म्हणजे आमच्यासाठी भावनिक प्रश्न आहे . जो आम्ही अत्यंत रांगडेपणाने हाताळतो . टोकदार पणाने .
आनंदी काळापासून आलेला हा वाद . वर्तुळाच्या आतील आणि बाहेरील.जे तुमच्याकडे तेच आमच्या कडे . फक्त आम्ही अजून विकसित देश आहोत म्हणून आमचे एजेस रफ आहेत.
भारतात माणसांना जोडण्यासाठी भाषा आहे आणि तोडण्यासाठी सुद्धा भाषाच आहे . तुमचे आमचे सेम च आहे . "
( मला मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी,मारवाडी भाषा समजतात. तेलुगु भाषा शिकतेय सद्या)
#internationalmotherlanguageday 
 #crossculture #Linguisticempathy #sulawrites #marathi 

Spiritual Intelligence

#spiritualintelligence Spiritual intelligence is an ability to access higher meanings, values, abiding purposes, and unconscious aspects of the self and to embed these meanings, values, and purposes in living richer and more creative lives. 


 #अध्यात्मिकबुद्धिमत्ता What I Think ( IQ ) What I feel ( EQ ) Who I am ( SQ ) 
SQ, or spiritual intelligence, underpins IQ and EQ. 
Signs of high SQ include an ability to think out of the box, humility, and an access to energies that come from something beyond the ego, beyond just me and my day-to-day concerns( by Danah Zohar ) 

व्यवस्थापन शिकताना अध्यात्मिक बुद्धिमत्ता महत्वाची असते? कशासाठी?आपल्याकडची ही बुद्धिमत्ता कशी ओळखायची? 
spiritual capital reflects what an individual or organization exists for, believes in, aspires to, and takes responsibility for. 
Based on this definition, it is a new paradigm that requires us to radically change our mindset about the philosophical foundations and practices of business, or any enterprise for that matter. I am not referring here to religion or spiritual practices.
12 तत्वं आहेत SQ साठी.
◇ Self awareness 
◇ Compassion 
◇ Ability to Reframe 
◇ Spontaneity 
◇ Positive use of Adversity 
◇ Celebration of Diversity 
◇ Sense of Vocation 
◇ Holistic Approach 
◇ Tendency to ask Fundamental questions 
◇ Being vision and value led 
◇ Field Independence 
◇ Humility 
तीन वर्षांपूर्वी Diversity Management चं एक वर्कशॉप केलं संव पावलो शहरात. हार्वड बिझनेस रिव्हू यांच्या ब्राझील येथील प्रकाशन संस्थेच्या कासा एज्युकेशन या कार्पोरेट एज्युकेशन शाखेत. तिथे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक बुद्धिमत्तांबद्दल जाणून घेता आलं. 
यावर ब्राझीलमध्ये बरीच पुस्तकं आहेत. कमेण्टमध्ये SQ विषयावर सुरूवातीपासून बरंच संशोधन करून अग्रक्रमाने पुस्तक लिहिलेल्या लेखिकेचा अभ्यासपूर्ण लेख पोस्ट करतेय.  



संत कबीर म्हणतात तसं 'बुरा जो देखन मैं चला, बुरा न निकलो कोई ' किंवा ' 
कबीर खडा बाजार में, 
सबकी मांगे खैर 
ना किसीसे दोस्ती, 
ना किसीसे बैर! 
बुद्धाचे नाक, कान ,वाणी होऊ शकणार नाही आपण पण आपल्या पातळीवर ही बुद्धिमत्ता अंगीकारू शकतोच. 

#sulawrites #crossculture #marathi #gratitude #marathi #मराठी 

Cafuné

आठ मार्चच्या निमित्ताने. फ्रेंच मानव्यवंशशास्त्रज्ञ या शब्दाचे मुळ अंगोला आहे असं म्हणतात. शब्दांच्या पलिकडील सांस्कृतिक जग.

 
मजूरांच्या - गुलामांच्या बोटी ब्राझीलला येत तेव्हा त्यांना हाच आपुलकीचा विरंगुळा होता. थकल्या भागल्या जीवाला मायेच्या स्पर्शाचा आधार. 
दुस-यांचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्याच्या केसांतून हात फिरवायचा #culturalmagic 

आज सकाळी ब्रेकफास्टसाठी या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे हा शब्द पुन्हा भेटला ( काफूने/ काफून ) #Cafune
#culturaltreasure

शब्द फक्त उच्चार किंवा काना मात्रा व्याकरण नसतं तर #संस्कृती असते.
आज  अशाच एका ब्राझिलियन रोमॅन्टिक शब्दाबद्दल, प्रेमातल्या एका सहज सुंदर नजाकत असलेल्या नख-याबद्दल सांगायचंय.
नखरा म्हणण्यापेक्षा अदा म्हणूयात किंवा एकात्मता म्हणूयात ज्यात लय आहे आणि या ' कुणी छेडिल्या तारा ' अशी उत्कटता आहे.
देश बदलला की रोमान्सच्या त-हा बदलतात.
ब्राझीलमध्ये केसांना घेऊन एक मोठ्ठी बाजारपेठ आहे.
यात रोमान्सचा भाग आहेच.
कसा?
तर इथल्या रोमान्समध्ये सुळसुळीत , हेल्थी,  खांद्यावरून खाली येणारे, समुद्राच्या लाटांप्रमाणे आणि नदीच्या वळणासारखे केस दिसतातच. 
आफ्रो ब्राझिलियन लोकसंख्या देखील केसांचे असंख्य प्राॅडक्टस वापरते. किमान त्यांचे Identity असलेले Anthropological Afro hair type साॅफ्ट होईल आणि केसांना एक लय येऊ शकेल.
नॅचरल केस आत्मविश्वासाने कॅरी करतानाही त्यांची फार काळजी घेतली जाते.
केस बोलले पाहिजेत.
तुम्ही एकटे असा वा नसा पण केस सुंदर असले पाहिजेत म्हणून आबालवृद्ध स्त्रिया, पुरूष, तरूण वर्ग सर्व काळजी घेतात.
काफूने हा एक शब्द रोमान्स मधल्या एका अदेचा.
तुम्ही जर सहज आजुबाजूला पाहिलं कुणी जोडपी असतील तर तो पुरूष/ मुलगा/ तरूण त्याच्या जोडीदाराच्या केसातून हात फिरवताना दिसतात.
ती स्त्री/ मुलगी/ तरूणी देखील तसं करताना दिसते. सहज बोलता बोलता ही तसं करतील.
या अदेला काफूने म्हणतात.
कैफ वरून काफूने !
तर हा शब्द आला कसा ?
' मोकळ्या केसांत माझ्या, तू जिवाला गुंतवावे'
ब्राझीलमध्ये वारंवार पहायला मिळतं.
शुक्रवारी सलूनमध्ये इतकी गर्दी असते केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी.
बायका आधीच वेळ घेतात.
पुरूषही मागे नाहीत यात.
अगदी टक्कल पडायला लागलं तर मात्र सगळे केस कापतात ते.

तर काफूने म्हणजे simple act of Affection .कुणाचं तरी डोकं मांडीवर घेऊन त्याच्या केसांतून हळूवारपणे हात फिरवणे, इतकं साधं सोपं आहे हे.

This act has roots in intimacy and affection .

या शब्दाबद्दल इतक्या  फिलाॅसाॅफीकल चर्चा झाल्यात.  कवितांमधून हा शब्द अजरामर झालाय.
केसांचा Maid Top Knot म्हणजे बुचडा ( I found this word very harsh 😢) बांधून सहसा कुणी इथे दिसलं नाही मला.

केस मोकळे सोडणा-या स्त्रिया पाहिल्यावर पुन्हा संस्कृती आठवते.
एक साधीशी गोष्ट पण त्याकडे वेगवेगळ्या संस्कृतीकडून पाहिलं तर!!
आपल्याकडे सहज एखादा  पुरूष म्हणला की लांब केस असलेली बायको हवी की त्याचा गंमतीत तात्विक शिरच्छेद झालाच समजा.
How dare you ? Expecting Long Hair ? सनातनी पुरूषी सगळी लेबल लागतील बिचा-याला.  लोकांनी याला सामाजिक प्रश्न करून टाकलंय.
खरंतर केस वाढवणं कापणं यात वैयक्तिक आवड असली पाहिजे.
ते रंगवणं देखील वैयक्तिक आहे.
कोणत्यातरी इझमच्या नावाखाली केसांच्या लांबीवरून गुलामगिरीत अडकलोय असं नसावं नस्तंय.
केस म्हणजे अस्मिता नाही पर्सनल अभिव्यक्ती आहे.
#internationalwomensmonth

#crossculture #sulawrites #CQ #Marathi

Placebo Bias

placebobias मुंबई ते दुबई ते रिओ प्रवास म्हणजे चोवीस तास गेलेच समजा.त्यात दुबई, कतार, पॅरिस, लंडन, ॲमस्टरडॅम मध्ये एक थांबा मग दुसरं विमान आणि पुढे चौदा पंधरा तासांचा प्रवास.
 यात शाडूची गणेश मूर्ती हमखास खंडित होत होती. तीनदा तसं झालं मग विचार केला स्वतःच मुर्ती बनवुयात. रिओ दि जनेरो शहरात भारतीय तसे कमी राहतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतके. सद्या तर महाराष्ट्राचा भगवा माझ्याच हातात आहे. 
मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मोहिनी जाता जात नाही. 
सहा वर्षांपूर्वी स्वतः गणपती बनवायचा ठरवला. उरूग्वे ची एक शिल्पकार स्नेही होती. तीचा क्लास लावला. महिन्याभरात गणपती करण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवात बसवता आला नाही कारण मुर्ती डिसेंबरमध्ये घडवली. आपल्याला मातीतून काही घडवता आलं याचं समाधान होतंच. ही मुर्ती नंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीला भेट म्हणून दिली.  
नंतरच्या भारत भेटीत मुंबईहून शाडूची मुर्ती आणली खास.
 #emiratesairline च्या काऊंटरवर एक मराठी मुलगा होता त्याला म्हटलं, गणपती आहे सोबत. मला एखादं सीट जास्त देतोस का? आजुबाजूला कुणी नको कारण संपूर्ण प्रवासात मुर्ती मांडीवर घेऊन जाणार आहे. शाडूची मुर्ती नाजूक आहे. खंडित नको व्हायला. सीट अपग्रेड साठी पैसे नाहीत. इकाॅनाॅमीत काय जुगाड होऊ शकतो? 

मी पाहतो काय ते, असं म्हणून त्याने आणखी गप्पा मारल्यात. बोलताना तो सुद्धा चार बंगला इथे राहणारा निघाला म्हणजे माझ्या माहेरच्या काॅलनीत. विमानात माझं सीट शोधलं.  
#storytime 
लहान मुलीसारखे क्राॅस फिंगर्स करून बसले. मनातल्या मनात माझ्या शेजारी कुणी नको असं बडबडत होते. एरव्ही माझ्या शेजारी फक्त आणि फक्त कुणी टाॅल ,डार्क /फेअर /ब्राऊन /यलो आणि हॅण्डसम ' बसावा म्हणून देव पाण्यात ठेवते पण त्या दिवशी तिन्ही सीट मला एकटीला हव्या होत्या .

' कुर्सी की पेटी' बांधा असं सांगे पर्यंत जीवात जीव नव्हता. अचानक टाॅयलेटमधून कुणी उगवायचं आणि बाजूला येऊन बसायचं ही सनातन Recurring भिती होतीच. 
पण गणपती पावला 🙏

 माझ्या शेजारच्या दोन्ही सीट रिकाम्या होत्या. त्या मुलाने मदत केली. पुणे ते मुंबई ते दुबई ते रिओ गणपतीबाप्पा स्वतंत्र सीटवर विराजमान होऊन आलेत. 
शाहरूख म्हणतो ते खरंय, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो वो मिल जाती है.  

#मराठी #sulawrites #crossculture #marathi #journey 

Dogs at work

workpartner #dogsatwork #dogsoflinkedin लुईज हा एका फेरिवाल्या आज्जीचा सहकारी आहे. फोटोत दिसतोय तो.

रिओ मधला रविवार चा बाजार.
कर्मयोगी असण्यासाठी जग इकडंच तिकडे करायची गरज नाही.


ही एक  चिया  ( मावशी / काकू ) सत्तरीत असेल.  दिसतेय खूप तरूण.
मी पाहिलेल्या सदासुखी माणसांपैकी एक आहे ती.
Second Hand वस्तू विकते .पावसापाण्यात ऊन्हातान्हात रिकाम्या रानी तिची मोडकळीस आलेली गाडी,  तिचा कुत्रा आणि भंगार गोळा केलेल्या वस्तू घेऊन ही वेगवेगळ्या बाजारांमध्ये तिची गाडी लावते.
दुर्दैवाने तिला सर्वात मागची जागा मिळते. जिथे फक्त पार्किंग झोन आहे.
गेले आठ वर्षं मी तिला दर रविवारी पाहतेय.

तिच्याकडे एक डब्बा गाडी आहे जी पोर्टेबल दुकान बनून जाते. गाडीचं बोनेट बनतं स्टेज.  लुईज तीचा पाळीव कुत्रा आहे.  आमच्या आकिचानचा
रविवारच्या बाजारातला मित्र सुद्धा.
रविवारी सगळे जण त्यांच्या पाळीव कुत्र्यांना बाजारात आणतात.
लुईज च्या गळयात पट्टा नसतो. तो मार्केट भर फिरत असतो.
मला गरज नसतानाही मी एखादी तरी वस्तू चिया कडून विकत घेतेच.

ती माझ्यासाठी Antic वस्तू घेऊन येते नेहमी.


पुन्हा केव्हातरी तिची विस्तृत मुलाखत करीन.

#streetmarkets #crossculture #sulawrites #marathi

Welcome to Indian Starbucks

#traveldiary #starbuckscoffee #customerfeedback
थकला भागला जीव रात्री नऊ वाजता वाशीच्या रेल्वे स्टेशनवर आला आणि दोन टक्के मोबाईल चार्ज पाहून नेहमीच्या सवयीने स्टारबक्स मध्ये गेला.
मागच्या आठवड्यात असंच झालं होतं. तिथं काम करणारा विक्रांत हा मराठी मुलगा आणि संदिप हा हिंदी भाषिक मुलगा माझ्या मोबाईल चार्ज साठी काॅर्ड शोधत होते.
एक महत्त्वाचा फोन येणार होता.

 


काॅफी घेईपर्यंत फोन थोडा चार्ज झाला मग लक्षात आलं माझे क्रेडिट कार्ड्स तसेच राहिलेत फोनच्या कव्हरमध्ये. विक्रांतने ते सांभाळून आणून दिलेत.
मग मनसोक्त गप्पा झाल्यात मराठीत.
आज पुन्हा थकून भागून तिथे गेले.
सोयालात्ते घेऊन बसले तर विक्रांत आणि संदिप माझं प्रेझेन्ट घेऊन आलेत.

कोण कुठली मुलं!

मी सुद्धा कोण कुठली व्यक्ती.

 
गेल्या काही वर्षात तिथे गेले तेव्हा गप्पा झाल्यात. या मुलांनी लक्षात ठेवल्यात.
आज खुप त्रासून गेले होते. अख्खा दिवस भर उन्हात व्हिटी, नरिमन पाॅइन्टला होते. बरीच कामं होती.

स्टारबक्सच्या मुलांनी मला दिलेली भेट आणि केलेलं स्वागत अनपेक्षित होतं.

एनाराय म्हणून भारतात येते तेव्हा मानगुटावरून मिनरल वाॅटरच्या बाटल्या बाजूला काढल्यात की खरा भारत दिसतो.

माणूस म्हणून माणसावर प्रेम करणारी साधी माणसं.

असा भारत आपल्याला हवाय.

#crossculture  #gratitude #sulawrites #marathi

दशदिशा मोकळ्या तुझशी

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर राम नव्याने भेटतो. 

सगळ्यांचं ऐकणारा.  सतत ऐकणारा राजा राम मला त्यागाचं उदाहरण वाटतो.  दशरथाचं ऐक,  वशिष्ठाचं ऐक,  कौसल्येचं ऐक,  कैकयीचं ऐक. 
रामाला काय हवंय हे कुणी विचारलंच नाही. 
( photo from Google ) 
रामराज्य आल्यावर निश्वास टाकता आला असता त्याला. 
आयुष्यभर इतरांसाठी जगताना आता तो स्वतः च्या साठी जगू शकला असता. 
धोब्याच्या शंकेमुळे ती इच्छा सुद्धा पूर्ण होण्याआधीच त्याला सीतेला जंगलात पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. 
जेष्ठ पुत्र म्हणून,  भावी राजा म्हणून त्याने सतत नियम पाळलेत. 
रामराज्य आल्यावर तरी सतत ऐकण्याची सजा मिळणार नाही अशी भाबडी आशा त्याला असणारंच. 
मात्र सीतेबद्दल होणा-या शंका- संशय आणि समजा तिला ही त्याच्याप्रमाणेच इतरांचे ऐकत जगावे लागले तर नवरा म्हणून,  राजा म्हणून तो त्याचा पराभव होता. 

स्वतःसाठी त्याने फार कमी निर्णय घेतलेत. 
सीतेला गर्भवती अवस्थेत जंगलात सोडताना तिला आणि तिच्या मुलांना इतरांच्या नजरेत कमीपणाने जगायला लागू नये म्हणून पहिल्यांदाच रामराज्यातील त्या राजाने स्वतःसाठी त्याग केला. 
सतत इतरांसाठी त्याग करून रामराज्य मिळाल्यावर पहिल्यांदा तो स्वार्थी झाला. 
सीतेला जंगलात पाठवताना तिला जपणं हेच त्याच्या मनात असणार. 
 सीतेला
अवकाश देऊन स्वातंत्र्य दिलं त्याने. 

राजाचा  स्वार्थी होण्याचा हक्क का नाकारायचा ? 
रामराज्यात सीतेला प्रचंड गाॅसिप्सचा ट्रोलिंगचा त्रास झाला असता. 

Correlation and casualty can not be mixed . 

वयाच्या या टप्प्यात मला राजाराम खूप दुःखी दिसतो. 
आयुष्यभर इतरांसाठी त्याग आणि तडजोड करणारे जेव्हा तर्कशुद्ध निर्णय घेतात.  आपल्या प्रियजनांना लोकक्षोभापासून भावनिक-सामाजिक  पातळीवर संरक्षण देतात त्यांना विचारून पहा? 

राम चुकला असेल. 
राजारामाने सीतेवर अतोनात प्रेम केलंय. 

लिनते चारूते सिते .

( राजा राम कोण्या एका राजकीय पक्षाचा नाही. राजा राम त्या सगळ्यांचा ज्यांनी ज्यांनी वडिल होऊन स्वतःच्या सुखाचा त्याग केला.  All those brothers and sisters who had taken higher road of sacrifice and justice just for others Benefits . सीतेचा त्याग होताच.  2022 मध्ये  ही तो  कुठे चुकतोय!!  रामाचं भाग्य,  एका क्षत्रिय राजाचं दुःख कालातीत आहे.  या टप्प्यावर आतून खचलेला राम सीतेशी असं वागलाय.  करूणा हा एकच शब्द दोघांसाठी)

Cultural Geography

Cultural Geography. गेले काही वर्षे मी याच विषयावरचे पेपर्स वाचतेय. लोकांना भेटतेय. बोलतेय. टुरिस्ट म्हणून नाही तर लोकल म्हणून. भुगोलाचा अभ्यास तोही संस्कृतीच्या अंगाने. का बरं करायचा हा अभ्यास? Human Geography समजून घेताना आपल्याला सांस्कृतिक दृष्ट्या भौगोलिक महत्व जाणून घ्यायचंय. 

आपण ज्या शहरात, गावात, जागेत वाढलो किंवा ज्या नैसर्गिक वातावरणात वाढलो त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. आपण ज्या सामाजिक प्रतिक्रिया देतो किंवा जसे रिस्पाॅन्ड करतो यावर आपल्या भौगोलिक स्थानाचा प्रभाव आणि पगडा असतो. 
एकोणिसाव्या शतकात हा अभ्यास सुरू झाला. मानव्यवंशशास्त्राची ही एक तुलनेनं नवीन शाखा असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे कारण यात, माणसं अशी का वागतात? अशीच का वागतात याचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करता येऊ शकतो. 

व्यक्तीच्या सवयी, तो पाळत असलेले सणवार, कुळाचार, चालिरिती, भाषा, धर्म विषयक मतं, आर्थिक स्तर, कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संगीताची जाण/आवड/कान,लोकांचं भौतिक साधनांकडे पाहण्याचा नजरिया, Material expressions of people , जागेसाठी ( गावासाठी/ मातृभूमी) असलेली अस्मिता-अहंकार-आत्मियता-आस्था-आपुलकी, लोकांशी कनेक्ट होताना संवाद साधतानाची एक्सप्रेशन्स, शारिरिक हालचाली, घरांची रचना, घरांची व्यापलेली जागा, पर्यावरण, शेती, भुभागाचा विकास आणि त्याचा व्यक्तिवर झालेला परिणाम, घरातलं फर्निचर, त्याची रचना, वापर, मुबलकता, पुस्तकांची जागा, स्वयंपाकघरात वापरले जाणारे पदार्थ, वाढण्याची पद्धत, ज्ञानाची निर्मिती कशी करतात किंवा संवाद साधताना कसा आचार विचार असतो, सरकारची भुमिका किंवा त्या भौगोलिक पट्ट्यात असलेल्या सरकारची कार्यप्रणाली या आणि अशा ब-याच बाजूंचा अभ्यास कल्चरल जिओग्राफी या विषयात केला जातो. 

बहुसांस्कृतिक बुद्धिमत्ता या विषयाला पुरक असल्याने मी हा अभ्यास करतेय. माझ्या consultancy साठी मला याची उपयुक्तता जाणवते. 

#sulawrites #crossculture #marathi #मराठी #peopledevelopment 

Domestic Engineer Prabha

labourday #domesticworkers 

आजच्या कामगार दिनानिमित्त प्रभा भोसलेची ओळख. 
ओशिवरात आनंदनगर म्हणून एक निम्न मध्यमवर्गीय बैठ्या घरांची काॅलनी आहे. 

 जुन्नर, मंचर, आंबेगाव परिसरातील डबेवाले, फुलवाले, भाजी विकणारा पुरूष वर्ग आणि घरकाम करणा-या स्त्रिया. आमच्या विभागात घरटी साताठ हजारांहून जास्त काम निघतंच.  
सधन, संपन्न आणि बहुतांशी अमराठी काॅलनी आहे ही. किमान हजार चौरसफुटांची घरे. घरटी तीन एक चारचाकी. तीन तीन डोमेस्टिक इंजिनिअर असतात काही काही घरात. या स्त्रिया शेअर रिक्षाने लोखंडवालात जातात कामाला. महिन्याला पाचेक हजाराची भिशी लावतात. गावी माडीची घर बांधतात. यांचे नवरे भल्या पहाटे गाड्या धुण्याचीही कामं करतात. स्मार्ट फोन वापरतात या डोमेस्टिक इंजिनिअर्स. राहणीमान उत्तम आणि स्वच्छता वाखाणण्याजोगी.  

यांची घर एकावर एक माडीची. अगदी दोनशे चौरस फुटांची देखील. मी मुंबईत आले की माझ्या डोमेस्टिक इंजिनिअरच्या घरी मासवडी खायला नेहमी जाते.  

इतके दिवस झालेत देश सोडून मी यातल्या सगळ्या माझ्या whatsapp मधे आहेत. इंदुरकरांचे forwards करतात मला. मराठा समाजातील, बहुजन समाजातील ,कुणबी समाजातील स्त्रिया व्यावसायिक रित्या हे काम सांभाळत आहेत. यांच्यावर एक अनुबोधपट व्हायला हवा.

  मुंबईल्या फिल्मी उपनगरात काम करणा-या घरंदाज स्त्रिया. ओशिवरा पोलिस स्टेशनमधे चौकशी केली तर रहिवाशांच्या तक्रारी भांडणं असतील पण या कष्टकरी स्त्रियांच्या तक्रारी कमी दिसतील. माझे या वर्गाशी घरचे संबंध आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी गेलेय त्यांनी मला बांगड्या भरायला पैसे ठेवा ताई म्हणत शंभर दोनशे रूपये हातात बळेबळे कोंबलेत.

फोटोतलं घर प्रभाचं आहे. ती माझी डोमेस्टिक इंजिनिअर होती ओशिव-यात.  
 माझे खूप लाड करते. दुधाचा चहा हा त्यातलाच प्रकार. तीच्या घरात इटालियन मार्बल आहे.

फोटोत तिचं घर दिसतंय ते आनंद नगर मधलं. 

प्रभाकडे स्मार्ट फोन आहे. तीला लिहिता वाचता येत नाही. ती मला voice messege / videos send करते.

#crossculture #मराठी #gratitude #marathi #sulawrites

Eid Mubarak in Brazil

Eid Mubarak to all My Muslim connections and Followers.May Allah accept your good deeds, forgive your transgressions and ease the suffering of all people around the globe. Eid Mubarak to you and your family! Here's wishing you and your family peace, harmony, happiness, good health and prosperity on the auspicious occasion of Eid.


It is' Eid ' Today But There is no celebration , No delicious food ,Not that enchanting eco of Azan" Allah ho Akabar'   Except we do give Hugs on daily basis as a Social etiquette .Brazil census says Muslim population is in minority.

Unofficial number is 15 m ( please correct me)

I know , Habib is the second largest food chain in Brazil and Brazil is among top scorer of Exporting Halal meat in the world .

Hammus, Falalfal , Kebab can easily found on street.150 Mosque s are here in Entire country.There are 3 Port translations of Holy Quran.

Brazilian constitute Article 5 (6) states the freedom of Belief ensuring the free exercise of religious worship .
Researchers claim that Brazil received more Muslims than anywhere in the Americas. Still there is no Eid Flavour in Media or in social circle.

Latin America is so different in social fabric.
There should be Enough representation of different Religions through Food and celebrations here .

I had seen Festa Junina But If Eid Food platter comes here socially then it could be strong bond between Muslim world and Americas .

फोटोमधील मस्जिद ही ब्राझीलमधील आहे.

#FelizEid
#ईदमुबारकहो
#crossculture #sulawrites #marath

Kodawari-The Pursuit of Perfection

Kodawari -The Pursuit of #perfection.
#Shokunin - professional artisan dedication to one's craft.
Perfection is a Myth ! 

What this picture says quietly and Firmly? 
Absolute dedication to craft. It shows country 's work ethics, It's pursuit of perfection, and the loyalty with attention to details.

I clicked this Photo in 2008 or 2009 in Tokyo - Edogawa ku ward. In front of Nakagawa River mouth and ocean front.
टोकियोमधील याच इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आम्ही आठ वर्षे राहिलो. 
नाकागावा नदी जिथे समुद्राला मिळते त्याच वळणावर ही इमारत होती. टोकियो शहरातील तेवीस विभागांपैकी एक वाॅर्ड- एदोगावा कू. इथे निशि कसाई म्हणून उपनगर आहे ज्याला इन्दोमुरा असंही म्हणतात कारण असंख्य भारतीय इथे राहतात. 
#Indomura म्हणजे भारतीय खेडे (गाव) 

This was my Apartment. We had some construction work going on for a month. To avoid pollution, to maintained safety and not to disturb ornamental beauty of outer side of Building, Construction workers covered our Building like this. 
This photo is reflection of Japanese #perfection #workethics and eye for details.
 We as a viewer knew constructions site in all Hollywood Bollywood movies in the Climax scene. A deadly fight or revealing secret of relationship, bullet fire or defusing Bombs, chasing actress, rape scene, kidnapping or suicide. Something extreme act which can change the story plot or come to conclusions.

 I would prefer to have coffee with Keanu Reeves here at this site with his "The Matrix "character NEO. 
 love my life as a Keen observer of Various places.
And it is not How much I write but What I write! 

Being a creative Writer, it inspires me a lot.
आपण एखाद्या देशाच्या संस्कृतीबद्दल बोलतो तेव्हा फक्त लोकप्रिय खाद्यपदार्थ, कपडे, नमस्काराच्या पद्धती, संगीत, नृत्य, सणवार आणि एक दोन स्टिरिओटाईप पद्धतींकडे त्या देशाची संस्कृती म्हणून पाहतो. खरंतर तो भाग फक्त हिमनगाच्या दिसणा-या टोकाचा वरचा भाग असतो. 
संस्कृती त्या पलिकडे असते. त्याबद्दल बोलायला हवं. तोच महत्वाचा गाभा असतो. 

(Part of my Immigrant Diary __Light notes)
#crossculture #japaneseculture #sulawrites 
こだわり #marathi 

Nothing is forever in life

storytime   Neither Glory nor struggle is forever in life .
आयुष्यात यश अपयश उनपाऊस असणारंच.
आपण आपल्या व्हॅल्यूज शी प्रामाणिक रहायचं. 
This is my fav photo.


बरेच  दिवस  झालेत .
मी रिओत राहते. रिओ दि जनेरो या शहरात .आता आठ वर्ष होतील. एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत मुलाखत होती. दुस-या शहरात. विमानाने जाणं महाग तर होतंच पण वेळखाऊ होतं .मला सकाळी जाऊन रात्री परत यायचं होतं. 
ते शहर 430 km दूर होतं.
ही मुलाखत एच आर डायरेक्टर आणि प्रेसिडेंट घेणार होते.
रिओ आणि संव पावलो मार्गावर प्रचंड विमान वाहतूक असते पण विमानतळ ते ऑफिस अंतर पार करायला टाईम मॅनेजमेंट होत नव्हती.
मग बसने जाण्याचा विचार केला .
तब्बल आठ तासांचा प्रवास .दुपारी दोनची मुलाखत होती.
पहाटे तीनला माझ्या डाॅगला वाॅक करवून आणला.मग लेकाचा ब्रेकफास्ट करून डायनिंग  टेबलवर ठेवला.  साडे चारची बस पकडण्याची पंचवीस किमी दूर मुख्य आगारात गेले टॅक्सी पकडून.
बफरिंग टाईम होताच .
संव पावलोत इतकं ट्राफिक असतं. तिथेच बस अडकली.
मी जीन्स टीशर्ट मध्ये होते. 
संव पावलो बस डेपोत फ्रेश होण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी सोय आहे. कपडे इस्त्री करता येतात.  वीस रूपये देऊन तुम्हाला शाॅवर घेता येतो.  यात साबण, स्वच्छ टाॅवेल मिळतात. तिथे हेअर ड्रायर असतो, इस्त्री असते.
मीही वीस रूपये देऊन अर्ध्या तासांत तयार झाले आणि मुलाखतीला गेले.
एच आर मधील जागेसाठी.
भारतातली फार मोठी आय टी कंपनी आणि तिचे ब्राझील प्रेसिडेंट हे पुणेकर  होते . आमच्या चक्क मराठीत गप्पा झाल्यात. 
मराठी, इंग्रजी आणि पोर्तुगीज मध्ये हा Interview होता .
ऑफिसचा पत्ता शोधत असताना रिसेप्शनला पोहोचले तेव्हा मागून कुणीतरी साहेब आलेत आणि म्हणालेत, वेळेवर पोहोचलीस सुलक्षणा 👏👏
त्यांनीच माझी माहिती दिली डेस्कवर आणि 'लेट्स गो ' म्हणत आम्ही लिफ्टकडे आलो.
लिफ्ट मध्ये गेल्यावर मला जाणवलं की मी पायातले जोडवे काढले नव्हते. स्कर्ट घातला होता. उगीच काॅन्शस होऊन गेले आणि चुकून वेगळ्याच मजल्याचं बटण दाबून बाहेर पडले.
तर ते प्रेसिडेंट म्हणालेत, अगं, तु आपल्या ऑफिसमध्ये आलीस ना? वरचा मजला आहे.  हा नाही  .
मी सदानंद गटणे भाव चेह-यावर घेऊन होते. 
ऑफिस मध्ये गेल्यावर तिथल्या रिसेप्शनला त्यांनी माझी बॅग ठेवायला सांगितली .
दहा मिनिटांनी मी केबिनमध्ये गेले. आमच्या गप्पा झाल्यात.  मुलाखत झाली.  खाणं झालं.  दोनदा चहा झाला. 
मग त्या प्रेसिडेंटने विचारलं, कशी जाणार परत?
मी म्हटलं बसने?
नको, इतकी दगदग झाली असेल .
त्यांच्या एच आर डायरेक्टरना सांगून
त्यांनी कंपनीची कार आणि ड्रायव्हर पाठवून मला पुन्हा बसडेपोला ड्राॅप केलं. संध्याकाळी सहाची बस होती .
मुलाचं बारावीचं वर्ष होतं त्यामुळे शहर बदलणं कठीण होतं .मला पहायचं होतं की इतक्या गॅपनंतर मला मुलाखत देता येतेय का?
आज ते एच आर डायरेक्टर आणि प्रेसिडेंट आपुलकीनं बोलतात. 
रिओ शहरातच काम करायचंय त्यामुळे पुन्हा त्यांना काॅल केला नाहीये पण मला कधीही कामासाठी नोकरीसाठी कोणत्या दरवाज्यावर नाॅक करावंसं वाटलं ब्राझीलमध्ये तथ सगळ्यात आधी मी त्या कंपनीत विचारपूस करीन. 

सगळ्याच नोक-या मिळवायच्या नसतात. 
न मिळालेल्या नोक-या आपल्याला माणसं मिळवून देतात. बस डेपो च्या चेंजींग रूममध्ये कपडे बदलले आणि मुलाखतीला तयार झाले.

कार्पोरेट कल्चर मधल्या सोफेस्टिकेशन ,स्पर्धेबद्दल बोललं जातं आज माणूसपणाबद्दल बोलूयात. वरच्या हुद्द्यावरील माणुसकी जपणारी  कार्पोरेट जगातली माणसं 🤗 #मराठी माणसं.

#sulawrites #marathi #techmahindra #reposting

Popular choice

Working Woman and Biases

#workingwomen #biases  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...